'त्याला कमी मानधन द्यायचंय'; करण जोहरच्या त्या वक्तव्याची सैफ अली खाननं उडवली खिल्ली!

Saif Ali Khan : सैफ अली खाननं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत याविषयी खुलासा केला आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Sep 27, 2024, 03:06 PM IST
'त्याला कमी मानधन द्यायचंय'; करण जोहरच्या त्या वक्तव्याची सैफ अली खाननं उडवली खिल्ली! title=
(Photo Credit : Social Media)

Saif Ali Khan : गेल्या काही दिवसांपासून निर्माते आणि कलाकार यांच्यात येणाऱ्या मानधनावरून चर्चा सुरु आहे. काही काळापूर्वी करण जोहरनं अशा काही कलाकारांवर निशाणा साधला होता जे मानधन 40 कोटी मागतात आणि त्यांच्या चित्रपटाचं ओपनिंग हे 5 कोटी देखील होत नाही. आता यासगळ्यावर बॉलिवूड अभिनेता सैफ अली खाननं प्रतिक्रिया दिली आहे. सैफ अली खान सध्या त्याचा आगामी चित्रपट ‘देवरा पार्ट वन’ मुळे चर्चेत होता. हा चित्रपट आज प्रदर्शित झाला असून सगळे कलाकार हे प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. अशा वेळी दिलेल्या एका मुलाखतीत सैफ अली खाननं करण जोहरच्या कलाकाराच्या मानधनावर वक्तव्य केलं आहेय 

सैफ अली खाननं ही मुलाखत इंडिया टुडेच्या कॉन्क्लेवमध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी सैफला प्रश्न विचारण्यात आला की करण जोहरनं म्हटलं होतं की कसे काही कलाकार हे एका चित्रपटासाठी 40 कोटी रुपये मानधन घेतात पण बॉक्स ऑफिसवर 3.5 कोटी रुपये देखील कमवू शकत नाही. त्यावर सैफ अली खान हसत प्रतिक्रिया देत म्हणाला, त्याला मानधनात कमी करायची आहे. मला वाटतं की यात मी माझी स्वत: ची एक यूनियन बनवायला हवी. तो अगदी योग्य बोलतोय हे मला माहित आहे, पण जेव्हा मानधनाच्या कमी विषयी ऐकतो तेव्हा मला ते थोडं चिंतेत टाकतं. मानधनात कमी करायला नको. 

सैफ अली खाननं सांगितलं की 'तुम्ही कोणत्या स्टारकडे जातात. कधी-कधी ते बोलतात, जर तुम्हाला मी तुमच्या प्रोजेक्टमध्ये हवा-हवी असेल तर त्याची एक योग्य रक्कम असेल. आणि लोकं त्यासाठी पैसे मोजायला तयार असतात. तर कधी-कधी अर्थव्यवस्था गडबडते. पण, भारतीय व्यावसायिक आहेत. त्यामुळे चित्रपटसृष्टी स्वत: मध्ये एक बिझनेस आणि फायनॅन्स सेंटेर आहे आणि लोकं त्यावर निशाणा साधत आहेत. पण करण जोहरला हे चांगलंच माहित आहे.' 

हेही वाचा : 'मी हे मान्य करते की...', IIM अहमदाबादमधील प्रवेशानंतर ट्रोल होण्यावर बिग बींच्या नातीनं सोडलं मौन

सैफ अली खाननं पुढे सांगितलं, 'करण ज्याविषयी बोलतोय, ते हे आहे की एखादा सेलिब्रिटी हा खूप जास्त मानधन घेतो आणि काम पूर्ण करत नाही, हे जास्त काळ टिकत नाही. आम्ही इतके जास्त पैसे घेत नाही. आम्ही मंदीमुळे सुरक्षित आहोत.'