Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Trailer : बॉलिवूडचा भाईजान सलमान खानच्या (Salman Khan) 'किसी का भाई किसी की जान' (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेनं प्रतिक्षा करत आहेत. जेव्हापासून चित्रपटातं पोस्टर प्रदर्शित झालं होतं. तेव्हा पासून प्रेक्षक ट्रेलर पाहण्यास उत्सुक होते. दरम्यान, सलमानच्या चाहत्यांची उत्सुकता संपली आहे. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. तर चित्रपटातील एक-एक डायलॉगनं प्रेक्षकांना वेड लावलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सलमाननं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून 'किसी का भाई किसी की जान' चा ट्रेलर शेअर केला आहे. 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटाच्या ट्रेलरची सुरुवात सुरुवात सलमान खानने त्याचे नाव नसल्याचे सांगून होते. लोक त्याला भाईजान या नावाने ओळखतात. भाईजानच्या आयुष्यात पूजा हेगडे कशी येते. पूजा हेगडे आणि सलमानच्या ऑफबीट रोमान्स हे होते. तर पूजा भाईजानला तिचा भाऊ वेकेंटशला भेटवते. पण वेकेंटशच्या आयुष्यात एक खलनायक असतो जो त्याला आणि त्याच्या कुटुंबाला संपवण्याचा प्रयत्न करत असतो. तर सलमान त्याचं प्रेम आणि तिच्या कुटुंबाला कसं वाचवतं हे पाहण्यासाठी सगळेच उत्साही आहेत. ट्रेलरमध्ये अॅक्शन आणि रोमान्सचा तडका लावण्यात आला आहे. तर पूजाला कसं सलमानवर प्रेम होतं तर त्यांच्या स्ट्रोरीमध्ये नक्की काय ट्वीट आहे. ते पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत. दरम्यान, ट्रेलर शेअर करत 'तुमच्या भाई आणि जानसोबत तुम्ही हा ट्रेलर पाहिलात?' असं कॅप्शन सलमाननं दिलं आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


सलमानच्या या ट्रेलरवर कमेंट करत त्याच्या चाहत्यांनी आम्हाला प्रचंड आवडला असून चित्रपट पाहण्यासाठी उत्साही आहोत असं सांगितलं आहे. तर चित्रपटाचा ट्रेलर प्रचंड व्हायरल झाला आहे. 


हेही वाचा : खळखळून हसवणाऱ्या Kushal Badrike ला 'या' आगळ्या वेगळ्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहते उत्सुक


या चित्रपटातील काही गाणी थोड्या दिवसांपूर्वी प्रदर्शित झाली होती. चित्रपटाच्या गाण्यांनी वेड लावलं असलं तरी देखील येंटम्मा गाण्यामुळे सलमानला ट्रोल करण्यात आलं होतं. या चित्रपटातील 'येंटम्मा' व्यतिरिक्त 'बिल्ली बिल्ली', 'नय्यो लगदा' आणि 'जी रहे थे हम' ही गाणी प्रदर्शित झाली आहेत. या चित्रपटात सलमान आणि पूजा व्यतिरिक्त शहनाज गिल, पलक तिवारी, भूमिका चावला, दाक्षिणात्य सुपरस्टार वेकेंटश दग्गुबाती, सिद्धार्थ निगम, जस्सी गिल आणि राघव जुयाल महत्त्वाच्या भूमिकेत आहे. दरम्यान, हा चित्रपट 21 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. 


दरम्यान, सलमान याआधी शाहरुखच्या पठाण या चित्रपटात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसला होता. तर 'किसी का भाई किसी की जान' शिवाय तो 'टायगर 3' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत कतरिना कैफ मुख्य भूमिकेत दिसणार आहे.