मुंबई : गेल्या काही दिवसांपासून टीव्हीवर 'बिग बॉस १४' ची जोरदार चर्चा रंगली आहे. 'विकेंड का वार' यामध्ये होस्ट सलमान खानने सगळ्या स्पर्धकांना चेतावणी दिली. तुम्ही पुढचा गेम चांगल्या पद्धतीने पुढे न्या असं सांगितलं. यावेळी सलमान खानने फेक टीआरपी मिळवण्याकरता प्रयत्न करणाऱ्यांवर देखील निशाणा साधला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नाव न घेता सलमान खानने टीआरपीच्या मुद्यावर अर्णब गोस्वामीवर निशाणा साधला आहे. टीआरपीसाठी फक्त खेळ खेळू नका. सलमान खानवर यावेळी कुणाचंही नाव न घेता आणि कोणत्याही चॅनलचं नाव न घेता निशाणा साधला. 



खोट्या टीआरपी प्रकरणात मुंबई पोलिसांना दिवसेंदिवस अधिक माहीती आणि पुरावे सापडत आहेत. सध्या फक्त मराठी, बॉक्स सिनेमा आणि रिपब्लिक टीव्ही या प्रमुख तीन चॅनेल आरोपीच्या पिंजऱ्यात आहेत. तसेच यात आणखी संशयीत असण्याची शक्यता मुंबई पोलीस महासंचालक परमबीर सिंह यांनी व्यक्त केली होती.


यामध्ये आता इंडिया टुडेचं नाव देखील समोर आलंय हंसा कंपनीचे माजी कर्मचारी विशाल भंडारी यांनी बार्कच्या अंतर्गत चौकशीदरम्यान ऑडीट टीमसमोर इंडीया टुडेच्या नावाचा उल्लेख केला. परेल येथील BARC च्या ऑफीसमध्ये १७ जूनला याप्रकरणी चौकशी झाली होती.