मुंबई : स्टार किड्स सिनेक्षेत्रात पदार्पण करणं ही काही नवीन बाब राहिली नाही. मग ते मराठीत असो वा बॉलिवूडमध्ये. अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता महेश मांजरेकर यांची मुलगी अश्वमी लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याची चर्चा रंगली आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सिनेकलाकारांची मुलं आपल्या आई - वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवतात. ते देखील सिनेसृष्टीत अभिनय किंवा इतर क्षेत्रात येतात. अशीच महेश मांजरेकर यांची मुलगी अश्वमी बॉलिवूडमध्ये दिसणार आहे. आपल्याला माहितच आहे महेश मांजरेकर आणि दबंग खान सलमान खान यांचं खूप जवळंच नातं आहे. 




अश्वमी ही दबंग खानसोबत 'दबंग 3' या सिनेमांत पदार्पण करत आहे. या बाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र मे महिन्यात या सिनेमाची शुटिंग सुरू होत असल्यातं म्हटलं जात आहे. दबंगच्या या सिरिजमधील हा 3 सिनेमा आहे. या सिनेमांत अश्वमीसोबतच टेलिक्वीन मौनी रॉय देखील बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. अश्वमी आणि  मौनी यांच्यासाठी ही खूप मोठी संधी आहे. 




अश्वमी महेश मांजरेकर यांच्या पहिल्या पत्नीची मुलगी 


अश्वमी महेश मांजरेकर ही महेश मांजरेकर यांच्या पहिल्या पत्नीची मुलगी आहे. महेश मांजरेकर यांची पहिली पत्नी दीपा. अश्वमीच्या भावाचं नाव सत्या असून त्याचा सैराट फेम आकाश ठोसरसोबत 'FU' हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. महेश मांजरेकर यांची मेधा ही दुसरी पत्नी आणि तीला सई नावाची मुलगी आहे. अश्वमीचा जन्म हा 29 ऑगस्ट 1988 मध्ये झाला. सोशल मीडियावर ती फार अॅक्टिव असते. अश्वामीने एक प्रोडक्शन हाऊस सुरू केलं आहे ज्याचं नाव आहे अश्वामी फिल्म प्रायव्हेट लिमिटेड असं आहे. 



दबंग सिनेमांतून या अगोदर सोनाक्षी सिन्हाला लाँच केलं होतं. दबंगच्या पहिल्या भागात सोनाक्षी सिन्हाने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. आणि अश्वमी डेब्यू करणार आहे.