मुंबई : साऊथ सिनेसृष्टीतील ग्लॅमरस क्वीन समंथा रुथ प्रभू गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे खूप चर्चेत आहे. काहि दिवसांपूर्वीच तिने पती नागा चैतन्यपासून घटस्फोट घेतल्याची घोषणा केली. नातं तुटल्यापासून तिने आत्तापर्यंत अनेक धार्मिक स्थळांनाही भेट दिली आहे. जसं की, असं केल्याने तिला या परिस्थीवर मात करता येईल. आणि यातून ती बाहेर पडेल. नुकतीच सामंथाने एक पोस्ट शेअर केली आहे. अभिनेत्रीची ही पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

समांथाने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत सामंथा गुलाबी रंगाच्या शॉर्ट्स आणि टॉपमध्ये एका मोठ्या दगडावर उभी असल्याचं दिसत आहे. तिच्यामागे दिसत असणाऱ्या धबधब्यामुळे तिचा हा फोटो अजूनच सुंदर दिसत आहे. तिचा हा फोटो पाहिल्यानंतर चाहत्यांना तिच्या फोटोंवरुन नजर हटवणं कठिण होत आहे. 


याचबरोबर फोटोला दिलेलं कॅप्शन चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे. शेअर केलेल्या कॅप्शनमध्ये सामंथाने लिहीलंय की, ''आयुष्यात त्याचा आनंद घ्या किंवा सहन करा, कारण जीवनात चढ-उतार येणारच.'' या पोस्टनंतर सांमथाने दिलेलं कॅप्शन चर्चेत आहे. या पोस्टला 17 लाखांपेक्षा व्हूज मिळाले आहेत.


लोकं  तिच्या पर्सनल लाईफशी ही पोस्ट जोडत आहेत. नागा चैतन्यसोबत विभक्त झाल्यानंतर सामंथाने  ऋषिकेशला जावून आपल्या धार्मिक यात्रेला सुरुवात केली. बऱ्याच प्रसिद्ध आश्रमातही सामंथा यावेळी गेली होती. आपल्या चारधाम यात्रेची झलकही सामंथाने सोशल मीडियावर शेअर केली होती. याचबरोबर आपल्या प्रोफेशनल लाईफमधूनही सामंथा खूप नाव कमवत आहे. 



पुष्पामधील आयटम सॉन्ग 'ऊ अंतावा' मधील तिच्या परफॉर्मेंन्सला लोकांनी खूप पसंती दिली. पण, तिचा धार्मिक प्रवास बघता असा अंदाज बांधता येतो की, आजही तिच्या हृदयाच्या कोपऱ्यात नागा चैतन्यसोबतच्या तुटलेल्या नात्याचं दु:ख आहे. ज्यावर मात करण्यासाठी ती सतत वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन  वेळ घालवत असते.