मुंबई : प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी आणि पती अभिनव कोहली यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून बिनसल्याचं समोर येत आहे. श्वेताने मुलाखतीत घरगुती हिंसाचाराला बळी पडत असल्याचं अनेकदा सांगितलं. अभिनव हा श्वेताचा दुसरा पती आहे. आता याप्रकरणी अभिनवने मोठा खुलासा केला आहे. SpotboyE ला दिलेल्या मुलाखतीत अभिनवने श्वेताने देखील मला मारलं असल्याचं सांगितलं आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून श्वेता घरगुती हिंसाचारामुळे चर्चेत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'श्वेताला मी कधीही मारलं नाही. मी एक चापट मारली होती. ते पलकने तिच्या पत्रात नमुद केलं आहे. त्यासाठी मी श्वेता आणि पलकची माफी देखील मागितली. सगळे वाद श्वेताने निर्माण केले. कारण तिला सांगता येइल की तिच्या सोबत  घरगुती हिंसा होत आहे. मी महिलांना मरेलं असा नाही.'



अभिनव पुढे म्हणाला, 'श्वेता मला मारायची. जेव्हा 2017 साली आमचं  भांडणं झालं तेव्हा माझ्या 3 महिन्यांच्या मुलाला घेवून गेली. मी अनेक वेळा मुलाला भेटण्याचा प्रयत्न केला. पण ती मला मुलाला भेटू देत नाही.' असं देखील तो मुलाखतीत म्हणाला आहे.  अभिनवने त्याचे काही फोटो देखील सोशल मीडियावर पोस्ट केले. 


अभिनवने पोस्ट केलेल्या फोटोंमध्ये त्याच्या डोळ्याखाली जखम असल्याचं देखील त्याने सांगितलं. श्वेता  मला काठीने मारायची. ही गोष्ट कोणाला माहित नाही. कारण मी कधी माध्यमांसमोर गेलो नाही. असं देखील अभिनव म्हणाला.