मुंबई : एकेकाळी चाहत्यांना पोट धरून हसायला भाग पाडणारी अभिनेता संजय दत्त आणि अर्शद वारसी ही जोडी रूपेरी पडद्यावर पुन्हा एकदा एकत्र झळकणार आहे. मुन्नाभाई आणि सर्किटच्या जोडीला चाहत्यांनी चांगलेचं डोक्यावर घेतले होते. २००३ साली प्रदर्शित झालेल्या 'मुन्नाभाई एमबीबीएस' या चित्रपटाच्या माध्यमातून संजूबाबा आणि अर्शदच्या मैत्रीची ओळख चाहत्यांना झाली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यानंतर २०१६ साली 'मुन्नाभाई एमबीबीएस' चित्रपटाचा सिक्वल 'लगे रहो मुन्नाभाई' प्रदर्शित झाला. या चित्रपटात त्यांची मैत्री बहरली असल्याचे दाखवण्यात आले. अर्शदने ई-टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत त्याच्या आगामी चित्रपटाबद्दल खुलासा केला आहे. 


अर्शद-संजयच्या आगामी चित्रपटात संजुबाबा एका दिव्यांग डॉनच्या भूमिकेला न्याय देणार आहे. महत्तवाचं म्हणजे संजय दिव्यांग असल्याचे कोणालाही ठावून नसल्याचे चित्रपटात दाखवण्यात येणार असल्याचे अर्शदने सांगीतले आहे.      


तब्बल १३ वर्षांनंतर संजय आणि अर्शद ही जोडी पुन्हा मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. या चित्रपटाची शूटिंग २०२० मध्ये मार्च किंवा एप्रिल महिन्यात सुरू होणार आहे. सध्या संजय दत्त त्यांच्या 'पानिपत' चित्रपटाच्या कामामध्ये व्यस्त आहे. चित्रपटात तो मुख्य भूमिकेत झळकणार आहे.