मुंबई : संजय दत्तचा बायोपिक संजू प्रदर्शित होवून महिना लोटला तरी देखील बॉक्स ऑफिसवर त्याचा बोलबाला कायम आहे. सिनेमाने आतापर्यंत ३३३ कोटींचा गल्ला केला आहे आणि ही कमाई वाढण्याची आशा आहे. सिनेमातील रणबीर कपूरच्या परफॉर्मन्सचे भरभरुन कौतुक होत आहे. तर काही लोकांना हा संजय दत्तची प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न असल्याचे वाटत आहे.


संजयच्या दोन पत्नी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इतकंच नाही तर सिनेमात दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांनी संजय दत्तच्या दोन्ही पत्नींचा रिचा शर्मा आणि रिया पिल्लईचा उल्लेखही केलेला नाही. त्यावरही अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. संजय दत्तचे दोन्ही विवाह अयशस्वी ठरले. माधुरी दीक्षितसोबत वाढलेल्या जवळीकीमुळे पहिली पत्नी रिचापासून संजय दूर झाला. त्यानंतर रिचा पिल्लईसोबत संजय दत्तने १९९८ मध्ये लग्न केले. त्यानंतर मुंबई ब्लास्ट केसमध्ये संजयला तुरुंगात जावे लागले. यावेळेसही ती संजयच्या पाठी खंबीरपणे उभी राहिली. पण हे लग्न फार टिकले नाही आणि २००८ मध्ये दोघे वेगळे झाले.


मी असे काहीही सांगितलेले नाही


मात्र संजू सिनेमात कोठेही त्याबद्दल उल्लेख नाही. यावर संजय दत्त म्हणाला की, मी फिल्म निर्मात्यांना माझ्या आयुष्यातील अनेक महिलांबद्दल सांगितले होते. मी त्यांना काहीही सांगितले नाही की हे दाखवा किंवा नका दाखवू. निर्मात्यांनी स्वतःचा माझ्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग सिनेमासाठी उचलला. कदाचित सिनेमा लांबू नये म्हणूनही काही भाग कट करण्यात आला असेल.


संजयची विनंती


संजयने सांगितले की, बायोपिक बनवण्याची कल्पना मान्यताची होती. तिनेच राजकुमार हिरानींशी बातचित केली. पुढे तो म्हणतो की, मी माझ्याजवळ बंदूक ठेवण्याची खूप मोठी किंमत चुकवली आहे. मी आतंकवादी नाही. कृपा करुन माझे कंफेशन नीट वाचा. मी कुठेही पळून गेलो नाही. समोर आलो आणि त्याची शिक्षा भोगली. 


आपल्या बहिणींविषयी संजय बोलतो...


संजय दत्त आपले वडील सुनील दत्तबद्दल बोलला की,  मी परदेशात सेटल व्हायला हवे होते. पण माझे वडील तिथे आले आणि म्हणाले परत चल. याशिवाय माझ्या आईचा माझ्या जीवनावर खूप खोलवर प्रभाव आहे. त्याचबरोबर माझ्या बहिणी प्रिया आणि नम्रताचे मान्यताशी कोणत्याही प्रकारचे भांडण नाही.