मुंबई : सेलिब्रिटी अनेकदा आपल्या हटके कपड्यांमुळे आणि स्टाईलमुळे चर्चेत असतात. पण कधीकधी हीच हटके स्टाईल त्यांना लाज आणते.  छोटे कपडे आणि स्टाईलच्या नादात oops moment ची शिकार होतात. सारासोबतही असाच प्रकार घडला जो कॅमेऱ्यात कैद झाला आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानच्या अभिनयासोबतच तिचा फॅशन सेन्सही खूप चर्चेत असते. प्रत्येक ड्रेस तिच्यावर अधिक खुलून दिसतो. तिच्या हटके स्टाईलमुळे ती नेहमी चर्चेत असते.


आता तिचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये ती जिमच्या बाहेर दिसत आहे. तिच्या स्टाईल आणि हटके लूक करण्याच्या नादात असं काही घडलं जे कॅमेऱ्यात कैद व्हायला नको होतं. त्यामुळे तिच्यावर टीका देखील होत आहे. 


सारा अली खान जिमबाहेर दिसली. गाडीमधून उतरत असताना तिने घातलेली शॉर्ट पँट खाली घसरली. तिच्या ते लक्षात आलं. तिने पटकन पँट हळूच वर ओढून घेतली. मात्र ही घटना मागे उभ्या असलेल्या लोकांनी कॅमेऱ्यात कैद केली. या घटनेनंतर साराला खूप ट्रोल करण्यात आलं.


सारा कपडे नीट करून पुन्हा कॅमेऱ्यासमोर येते. पोज देते आणि तिथून निघून जाते. साराचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तिला सोशल मीडियावर खूप ट्रोल करण्यात आलं आहे. तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.