मुंबई : क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर याची मुलगी सारा तेंडुलकर सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टीव्ह असते. सोशल मीडियावर विविध पोस्ट, फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करून ती चाहत्यांशी संपर्कात असते. मात्र आज त्याच सोशल मीडियवर सारा तेंडुलकरला ट्रोल केलं जातंय, तिला नेमकं का ट्रोल केलं जातंय याची माहिती अद्याप समोर आली नाही आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हायरल भय्यानी या अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओत सारा तेंडुलकर शहरात स्पॉट झाली होती. यावेळी सारा तेंडुलकरने काळी पँट आणि पांढरा टॉप घातला होता. तिने तिचे केस अर्धवट बांधले होते. या तिच्या व्हिडिओतील लुकवरून तिला ट्रोल करण्यात येत आहे.  



सारा तेंडुलकरला नेटिझन्सकडून ट्रोल केले जात आहे. नेटिझन्स तिला 'आंटी', 'स्टीम मोमो' आणि 'नेपाळी' म्हटले आहे. तर काहीजण टिप्पण्यांमध्ये शुभमन गिलबद्दल पोस्ट करत आहेत.अशाप्रकारे तिला सोशल मीडियावर ट्रोल केलं जातंय.