Sonali Bendre Says Saroj Khan Was Ready To Murder Her : बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रेचे लाखो चाहते आहेत. सोनालीनं नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. तिनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत कोरियोग्राफर सरोज खान यांच्याविषयी एक खुलासा केला आहे. तिनं सांगितलं की जेव्हा तिनं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं तेव्हा तिनं अभिनयाचे कोणतेही धडे घेतले नव्हते. त्यामुळे तिला नीट डान्स सुद्धा करता येत नव्हता. तिच्या डान्सिंग स्किल्स पाहून सरोज खान या निराश झाल्या होत्या. त्या सोनालीचा जीव घेण्यासाठी तयार होत्या.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोनालीनं ही मुलाखत 'मिड डे' ला दिली होती. या मुलाखतीत सोनालीनं शाहरुख खानसोबत 'इंग्लिश बाबू देसी मेम' च्या शूटिंगच्या दरम्यानची एक घटना सांगितली आहे. जेव्हा कोरिओग्राफर सरोज खान यांनी सोनालीचा डान्स पाहिला आणि त्या निराश झाल्या की त्या तिला मारण्यासाठी तयार झाल्या होत्या. याविषयी सविस्तर सांगत सोनाली म्हणाली, ना ती ट्रेंड डान्सर होती ना एक थिएटर आर्टिस्ट होती. तिला कोणत्याही गोष्टीचा अनुभव हा नव्हता. तरी सुद्धा 'हम्मा हम्मा' या एका गाण्यामुळे ती एका रात्रीत स्टार झाली. सोनालीनं सांगितलं की या गाण्याच्या शूटिंगच्या वेळी ती इतकी चिंतेत होती की तिला रात्री झोप देखील यायची नाही. तिनं सांगितलं की या चित्रपटानं चांगली कामगिरी केली नसली तरी देखील चित्रपटातील गाण्यानं तिला चांगली लोकप्रियता मिळाली. 



त्यावेळी घडलेला किस्सा सांगत सोनाली म्हणाली, सरोज खान यांचा असिस्टंट अहमद खान तिनं आणखी प्रॅक्टिस करावी आणि तिला मोटिव्हेट करण्यासाठी तिला लाच म्हणून आयस्क्रिम आणि चॉकलेट द्यायचे. सोनालीनं एकदा डान्सरची भूमिका साकारली होती आणि तिल डान्स येत नव्हता. ती फक्त त्याविषयी विचार करायची की सरोज खान यांना तिला डान्स शिकवण्यासाठी किती मेहनत करावी लागते. खरंतर जेव्हा केव्हा सोनालीला वेळ मिळायचा तेव्हा ती डान्स शिकण्याचा प्रयत्न करायची.


हेही वाचा : 'मंदिरात दिखावा'; सासूसोबत पूजा आणि मंत्र जाप केल्याचा VIDEO शेअर करताच अंकिता लोखंडे ट्रोल


सोनालीनं सांगितलं की अहमद खान तिला तिच्या घरून घेऊन जायचे आणि रिहर्सल हॉलमध्ये प्रॅक्टिस करुन घ्यायचे. तिनं सांगितलं की तिला खूप निराश वाटायचे की बस आता ती सहन करु शकत नाही. हे जाणवताच ज्या प्रकारे एका छोट्या मुलाला लाच देतात त्या प्रकारे अहमद तिला प्रोत्साहन देण्यासाठी चॉकलेट आणि आयस्क्रिम द्यायचे