'मंदिरात दिखावा'; सासूसोबत पूजा आणि मंत्र जाप केल्याचा VIDEO शेअर करताच अंकिता लोखंडे ट्रोल

Ankita Lokhande Troll : अंकिता लोखंडेनं नुकत्याच शेअर केलेल्या त्या व्हिडीओनंतर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

दिक्षा पाटील | Updated: Jun 16, 2024, 11:04 AM IST
'मंदिरात दिखावा'; सासूसोबत पूजा आणि मंत्र जाप केल्याचा VIDEO शेअर करताच अंकिता लोखंडे ट्रोल title=
(Photo Credit : Social Media)

Ankita Lokhande Troll : अभिनेत्री अंकिता लोखंडेनं छोट्या पडद्यापासून मोठ्या पडद्यापर्यंत प्रवास करत स्वत: चं स्थान मिळवलं. तिनं तिच्या करिअरमध्ये एकता कपूरच्या 'पवित्र रिश्ता' या मालिकेतून सुरुवात केली. तिनं तिच्या अभिनयानं प्रेक्षकांची मने जिंकली आहे. अंकिता नेहमीच तिच्या कामासोबत तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. त्यात अंकिता आणि तिची सासू या नेहमीच चर्चेत असतात. अंकितानं नुकताच तिच्या सासूसोबत एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. तर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. 

अंकिता लोखंडेन तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत ती तिची सासू रंजना जैन यांच्यासोबत दिसत आहे. रंगजा यांच्याविषयी बोलायचे झाले तर त्या अंकिता आणि विकी बिग बॉसच्या घरात असताना चर्चेत आल्या होत्या. त्या नेहमी मुलगा विकीची बाजू घेताना दिसायच्या आणि अंकिताला ओरडताना किंवा काही तरी बोलताना दिसायच्या. त्याचं कारण म्हणजे अंकिता आणि विकी 'बिग बॉस 17' मध्ये असताता सतत भांडायचे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

दरम्यान, आता अंकितानं एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत अंकिता तिची सासू रंजना जैन यांच्यासोबक मंदिरात दर्शनासाठी गेल्याचे पाहायला मिळाले. व्हिडीओत अंकितानं पिवळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. तर तिच्या सासूनं पिवळ्या आणि पांढऱ्या रंगाची साडी नेसली आहे. अंकितानं शेअर केलेल्या या व्हिडीओत ती तिच्या सासूला मंदिराच्या पायऱ्या चढण्यात मदत करते आणि त्यासोबत आरती करताना दिसते. व्हिडीओत सासू-सुनेची जोडी ही मंदिरात पूजा करताना आणि मंत्र जाप करताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करत अंकितानं कॅप्शन दिलं आहे की आध्यात्मिकतेसोबत तिचं आणि तिच्या सासूनं खूप खोलवर असलेलं असं नातं आहे. याचा अर्थ सासूसोबत वेळ व्यथित करणं आणि नेहमी मंदिरात जाणं सुरु केलं आहे. तर तिच्यासाठी सासूसोबत मंदिरात जाणं एका परंपरेसारखं झालं आहे. त्यामुळे त्यांच्या नात्याला हे आणखी खास बनवतं. 

हेही वाचा : कुणाला विश्वास बसेल का? 80s चा सर्वात लोकप्रिय अभिनेता आधी नक्षलवादी होता!

अंकितानं हा व्हिडीओ शेअर केल्यानंतर त्यावर नेटकऱ्यांनी विविध कमेंट करण्यास सुरुवात केली आहे. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, 'हे फक्त दाखवण्यासाठी आहे.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'मंदिरात दर्शनासाठी जाते आणि ते सगळं शूट करते.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'दर्शन आणि जप करताना रील करण्याची काय गरज आहे.' आणखी एक नेटकरी म्हणाला, 'किती ते खोटं.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'सोशल मीडियासाठी हे सगळं करणं गरजेचं आहे का?'