Satyaprem Ki Katha Box Office Collection Day 1: बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी यांचा ‘सत्यप्रेम की कथा’ हा चित्रपट काल गुरुवारी 29 जून रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. चित्रपटातील गाणी पाहता अनेक लोक चित्रपट पाहायला जातील अशी अपेक्षा चाहत्यांना लागली होती. दरम्यान, या चित्रपटाच्या प्री-बुकिंगला इतका प्रतिसाद मिळाला नाही जितका  भूल भुलैया 2 या चित्रपटाला मिळाला. या सगळ्यात 'सत्यप्रेम की कथा' या चित्रपटाच्या पहिल्या दिवसाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'सत्यप्रेम की कथा' हा चित्रपट 2 हजार स्क्रिन्सवर प्रदर्शित झाला. तर पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसनं 10 कोटींपेक्षा कमी कमाई केली आहे. पहिल्या दिवशी हा चित्रपट पाहण्यासाठी जाणाऱ्या लोकांनी चित्रपटगृहातील 13.96 टक्के होती. चित्रपट सुट्टीच्या दिवशी प्रदर्शित करण्याचे निर्मात्याचे कारण हे सुट्टीचा फायदा होईल असे होते. पण त्याचा काही फायदा झाला नाही. अशात हा चित्रपट विकेंडला चांगली कमाई करेल अशी अपेक्षा निर्मात्यांना आहे. sacnilk च्या रिपोर्टनुसार या चित्रपटानं पहिल्याच दिवशी भारतातील बॉक्स ऑफिसवर ठीक ठाक कमाई केली आहे. चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर डबल डिजीट कमाई करण्यास अपयशी ठरला. तर दुसरीकडे चित्रपटानं 7.50 ते 9 कोटींची कमाई केल्याचे म्हटले जात आहे.  



ट्रेड एनालिस्ट सुमिक कडेलनं 'सत्यप्रेम की कथा' हा चित्रपट अशा काही चित्रपटांपैकी एक आहे. ज्यानं कोरोना काळानंतर आगाऊ बूकिंगमध्ये चांगलं काम केलं आहे. बुधवारी सकाळी 10 वाजेपर्यंत त्याची 51 हजार 500 तिकिट बूक करण्यास आली होत्या.


कियारा आणि कार्तिक पहिल्यांदा कोणत्या चित्रपटात एकत्र दिसले नाही तर या आधी त्यांचा 'भुल भुलैया 2' हा चित्रपट आला होता.  'भुल भुलैया 2' चित्रपटाच्या तुलनेत  'सत्यप्रेम की कथा' च्या ओपनिंग  काही चांगली कमाई केली नाही. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी 14 कोटींचा गल्ला केला होता. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कार्तिक आर्यनचा या आधीचा जो चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्या चित्रपटाचं नाव 'शहजादा' अस असून त्यानं पहिल्या दिवशी 6 कोटींचं कलेक्शन केलं होतं. त्यामुळे आता कार्तिकचा हा चित्रपट कसा असेल किंवा त्याला प्रेक्षकांचा किती प्रतिसाद मिळेल याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. 


हेही वाचा : Lust Stories 2 Twitter Review: तमन्ना आणि विजयसोबतच पन्नाशीतल्या काजोलनंही वळवल्या नजरा


दरम्यान, कार्तिक आणि कियारा व्यतिरिक्त या चित्रपटात सुप्रिया पाठक कपूर, गजराज राव, सिद्धार्थ रंधेरिया, अनुराधा पटेल, राजपाल यादव, निर्मित सावंत आणि शिखा तलसानिया आहेत. तर चित्रपटाचं दिग्दर्शन मराठमोळ्या समीर विद्वान्सने केलं आहे