ब्युरो रिपोर्ट, झी मिडीया, मुंबई : दिवाळीचा मुहूर्त साधत 'गोलमाल अगेन' आणि 'सिक्रेट सुपरस्टार' हो दोन सिनेमे या वीकेंडला प्रदर्शित झाले... बॉक्स ऑफिसवॉरमध्ये दोन्ही सिनेमांमध्ये 'कॉंटे की टक्कर' बघायला मिळते आहे. यात 'गोलमाल अगेन'ने बाजी मारत 'सिक्रेट स्पपरस्टार'ला मागे टाकले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रोहित शेट्टीच्या गोलमाल अगेनला पहिल्या दिवशी बंपर ओपनिंग मिळाले. या सिनेमाने पहिल्याच दिवशी तब्बल 32 कोटींचा गल्ला जमवला. या निमित्ताने सगळ्यात जास्त ओपनिंग मिळवणारा या वर्षातील हा दुसरा सिनेमा ठरण्याचा बहुमानही या सिनेमाने मिळवला. तीन दिवसांमध्ये या सिनेमाने ८८ कोटींची दमदार कमाई केली आहे. तर, दुसरीकडे मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानचा सिक्रेट सुपरस्टारने चार दिवसांमध्ये 34 कोटींची कमाई केली आहे.  दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेला हा सिनेमा समिक्षकांच्या पसंतीस उतरला खरा. पण, प्रेक्षकांनी मात्र, या सिनेमाकडे पहिल्याच दिवशी पाठ फिरवली.


अमिरच्या सिक्रेट सुपरस्टारने पहिल्या दिवशी केवळ 5 कोटींची कमाई केली होती. मात्र, माऊथ पब्लिसिटीचा फायदा या सिनेमाला झाला. अल्पावधीतच या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगली पकड घेतली. प्रेक्षकांचा प्रतिसाद या सिनेमाला मिळू लागला. सिनेमाचं प्रमुख आकर्षण ठरली दंगल फेम झायरा वसीम.एका युवतीचा गायिका बनण्याचा प्रवास या सिनेमातून रेखाटण्यात आलाये. एकंदरीत मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान पुन्हा एकदा दुसऱ्या सिनेमासाठी लकी ठरला आहे..आतापर्यंत आमिरच्या अपोझिट जेही सिनेमे प्रदर्शित झालेत सगळ्यांनीच बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई केली आहे...


१९८९ साली आमिरचा दिल आणि सनी देओलचा घायल हे दोन्ही सिनेमे एकाच दिवशी प्रदर्शित झाले होते. हे दोन्ही सिनेमे बॉक्स ऑफिसवर सुपरडुपर हिट ठरले होते..1990 साली आमिरच्या जवानी झिंदाबाद बरोबर आशिकीची स्पर्धा होती...आमिरचा सिनेमा हिट झाला तर आशिकीहा ब्लॉकबस्टर ठरला होता..


१९९१ साली रेखाच्या फुल बने अंगारे या सिनेमाची स्पर्धा आमिरच्या 'दिल है की मानता नही'शी होती...दोन्ही सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर चांगलं यश मिळवलं होतं...1995 साली तर किंग खान शाहरुख आणि आमिरची बॉक्स ऑफिसवर स्पर्धा रंगली होती..शाहरुखच्या राम जाने आणि आमिरच्या अकेले हम अकेले तुम दोन्ही सिनेमांनी चांगलं यश मिळवलं होतं..


२००१ मध्ये पुन्हा एकदा आमिर आणि सनी देओल आमने-सामने आले..आमिरचा लगान आणि सनी पाजीचा गदर-एक प्रेमकथा हे दोन्ही सिनेमे ब्लॉकबस्टर ठरले होते...


२००७ मध्ये आमिरची स्पर्धा खिलाडी अक्षय कुमारशी होती. अक्षयचा वेलकम आणि आमिरचा तारे झमीन पर हे दोन्ही सिनेमे एकाच दिवशी प्रदर्शित झाले होते. अक्षयचा वेलकम ब्लॉकबस्टर ठरला होता तर आमिरच्या सिनेमालाही चांगलं यश मिळालं होते..


आता पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती झालीये. रोहित शेट्टी आणि टीमसाठी आमिर खान लकी ठरला आहे....एकीकडे आमिरचा सिक्रेट सुपरस्टार बॉक्स ऑफिसवर चांगला व्यवसाय करतो आहे तर दुसरीकडे गोलमाल अगेन ब्लॉकबस्टर ठरला आहे.