Shah Rukh Khan Video: शाहरूख खानचे जगभरात लाखो फॅन्स आहेत. त्याला भेटण्यासाठी प्रत्येक जण उत्सुक असतात. आपल्यालाही माहितीच आहे की शाहरूख खानच्या वाढदिवसाला दरवर्षी तो आपल्या मन्नत बंगल्याच्या बालगनीमध्ये आपल्या चाहत्यांना भेटायला येतो आणि त्याच्यासाठी लाखो चाहत्यांची गर्दी जमलेली असते. त्यांच्या चाहत्यांना तो यावेळी हात दाखवतो आणि तेही त्याची एक झलक पाहण्याची उत्सुक असतात. त्यामुळे या क्षणाची सर्वांनाच उत्सुकता लागून राहिलेली असते. सध्या अशीच एक व्हायरल बातमी समोर येते आहे. शाहरूख खानच्या मन्नतबाहेर 300 फॅन्स जमले आणि त्यांनी असं काही केलं की ते पाहून चक्क शाहरूखही गहिवरून गेला. सध्या या क्षणाचे फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होते. तुम्हीही जर का शाहरूख खानचे डायहार्ट फॅन असाल तर तुमच्याही डोळ्यातून टचकन पाणी येईल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या शाहरूख खानचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून त्यांच्या चाहत्यांनी तूफान कमेंट्स केल्या आहेत. यावेळी मन्नतच्या बाहेर असंख्य शाहरूख खानचे चाहते उपस्थित होते. त्यांनी टीशर्ट घातले होते. ज्यावर 'पठाण' या शाहरूखच्या यावर्षी सर्वाधिक गाजलेल्या चित्रपटाचे प्रमोशन करण्यात आले होते. यावेळी शाहरूख खानच्या सिग्नेचर पोझमध्ये सगळ्यांनी पोझ दिली आणि शाहरूखचे मनं जिंकून घेतले. या 300 फॅन्सची शाहरूख खानची सिग्नेचर पोझ एकाचवेळी एकाच ठिकाणी दिली आणि त्यांचे नावं हे गनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आले. हे पाहून शाहरूख खानही भारावून गेले. तुम्हीही हे फोटो पाहून भारावून गेल्याशिवाय राहणार नाही. 



| यावेळी शाहरूख खानच्या बाहेर चाहत्यांनी गर्दी केली होती. त्याच्या आयकॉनिक सिग्नेचर स्टेपवरून त्यांनी पोझ दिली आणि गिनिज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव नोंदवलं. 


'स्टार गोल्ड' या टेलिव्हिजन चॅनेलवरती शाहरूख खानचा यावर्षी सर्वाधिक गाजलेला चित्रपट 'पठाण'चा प्रिमियर होणार आहे. तेव्हा या चित्रपटासाठी त्याच्या प्रेक्षकांना कोण उत्सुकता लागून राहिली आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनापुर्वीच हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला होता.


परंतु अखेर 25 जानेवारी रोजी हा चित्रपट संपुर्ण जगभरात पदर्शित झाला आणि या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर तूफान कमाई केली आहे. त्यामुळे सध्या या चित्रपटाचीच चर्चा आहे. 6 महिन्यांनंतर हा चित्रपट टेलिव्हिजनवर येतो आहे. त्यामुळे प्रेक्षकांना घरबसल्या मनोरंजनाची पर्वणी मिळणार आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


हा चित्रपट 18 जूनला रात्री 8 वाजता प्रमियर होणार आहे. यावेळी हा क्षण पाहून शाहरूखही भारावून गेला. त्यानं बालकनीत येऊन त्याच्या फॅन्सची भेट घेतली आणि आपल्या फॅन्सला फ्लाईंग किस दिली.