Shah Rukh Khan Viral Video: काही दिवसांपूर्वी बॉलिवूडचा किंग खान म्हणजे शाहरूख खान याचा फॅन (Shah Rukh Khan Fan Movie) नावाचा सिनेमा प्रदर्शित झाला होता. या सिनेमामध्ये शाहरूख खानच्या डुब्लिकेट (Shah Rukh Khan Duplicate) दाखवण्यात आता होता. फॅन चित्रपटाच्या माध्यमातून शाहरूखने चाहत्यांच्या वेदना प्रकट करण्याचा प्रयत्न केला होता. त्याच्या या सिनेमाला भरघोस यश देखील मिळालं. अशातच आता शाहरूखचा खराखुरा फॅन आता चांगलाच व्हायरल (Viral Video) झाला आहे. सध्या त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान शेअर केला जातोय. त्यामुळे चाहत्यांचे डोळे देखील चक्रावले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्वत:ला छोटा शाहरुख खान म्हणवणाऱ्या सूरज कुमार (Suraj Kumar) नावाच्या व्यक्तीने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. तो दिल्लीत एका आउटिंग दरम्यान आपल्या कुटुंबासोबत पोज देताना दिसत आहे. शाहरूखच्या लूकपासून त्याच्या स्टाईलपर्यंत सगळं काही सेम टू सेम दिसतंय. ट्रेंड होत असलेल्या व्हिडिओमध्ये सूरज 90 च्या दशकातील शाहरुख खानसारखा (Shah Rukh Khan Lookalike) दिसत आहे. सूरजच्या केसं, त्याचा बॅगी टी-शर्ट आणि काळा सनग्लासेसपर्यंत सगळं काही हुबेहुब सारखंच दिसतंय.


आणखी वाचा - Asur 2 review: मानवी नैतिकता चांगली की वाईट? ट्विस्ट, सस्पेन्स आणि थ्रिलर वेब सिरीज 'असूर 2' नक्की पाहा!


ऐश्वर्या राय बच्चन, कतरिना कैफ आणि सलमान खानसारखे दिसणारे लोक तुम्ही सोशल मीडियावर अनेकवेळा पहायला मिळतात. अशातच आता शाहरुख खानच्या लूक लाइकचे व्हिडिओ (Shah Rukh Khan Viral Video) सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यामुळे चाहत्यांच्या मनात गोंधळाची स्थिती निर्माण झाल्याचं दिसतंय.


पाहा Video



दरम्यान, शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खान (Aryan Khan) सिनेसृष्टीत पदार्पण करण्यासाठी सज्ज झालाय. आर्यन खानच्या या सीरिजचं नाव 'स्टारडम' असल्याचं समोर आलंय. आर्यन खान या सीरिजचं दिग्दर्शन करणार आहे. 'स्टारडम' ही सीरिज पुढील वर्षी ओटीटीवर रिलीज होणार असल्याची माहिती समोर आली होती. खुशी कपूर, अगस्त्य नंदा, वेदांग रैना आणि मिहिर आहूजा या कलाकारांनी या सीरिजमध्ये नशीब आजमावलंय.