Shah Rukh Khan Slumdog Millionaire: बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खानचे लाखो चाहते आहेत. शाहरुख खाननं दुबईतील वर्ल्ड गव्हर्नमेंट समितमध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी त्यानं अनेक गोष्टींवर चर्चा केली. त्यापैकी एक म्हणजे त्यानं 'स्लमडॉग मिलियनेयर' या चित्रपटाला नकार का दिला? त्या चित्रपटातील त्याला महत्त्वाच्या भूमिकेची ऑफर मिळाली होती. मात्र, त्या भूमिकेमुळे त्याच्या इमेजवर कसा परिमाण होईल हे त्याला कळतं नव्हतं. शाहरुख खाननं हे देखील सांगितलं की त्यानं हॉलिवूड चित्रपटांमध्ये काम का केलं नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुबईमध्ये एका मुलाखतीत शाहरुख खानला विचारण्यात आलं की 'आता पर्यंत त्यानं एकही हॉलिवूड चित्रपटांमध्ये काम का केलं नाही?' या प्रश्नावर शाहरुख उत्तर देत म्हणाला की 'मी हे अनेकदा सांगितलं आहे, पण लोकांना माझ्यावर विश्वासच केला नाही. हॉलिवूडमध्ये आजपर्यंत मला कोणी अशी काही वेगळी भूमिका ऑफर केली नाही. मी वेस्ट (हॉलिवुड) आणि अमेरिकन चित्रपटसृष्टीत काही लोकांना ओळखतो. खरं सांगू तर अनेकदा माझं त्यांच्याशी बोलणं देखील झालं. मात्र, कधीच मला चांगली अशी ऑफर मिळाली नाही.'



पुढे शाहरुख म्हणाला, 'मी अनेकदा कलाकारांना हॉलिवूडमध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त करताना पाहिलं आणि ऐकलंय. मला असं वाटतं की ज्या लोकांना मी आवडतो, त्यांच्यापर्यंत मला काय वाटतं हे मी पोहोचवू शकत आणि मी ती इच्छा फक्त माझ्यामनातच का ठेवावी. शाहरुख खाननं हे देखील सांगितलं की त्याला 'बॉन्ड' खलनायकाची भूमिका साकारायला आवडेल. तर जेम्स बॉन्डची भूमिका करण्यासाठी उंचीत तो खूप लहाण आहे असं सांगितलं.' 


शाहरुखनं पुढे 'स्लमडॉग मिलियनेयर' मध्ये असलेल्या होस्टच्या भूमिकेसाठी विचारण्यात आलं होतं. मात्र, अखेर त्या भूमिकेत आपल्याला अनिल कपूर दिसले होते. हा चित्रपट का सोडला याविषयी शाहरुखनं यावेळी सांगितलं. 'हो,  स्लमडॉगच्या भूमिकेसाठी मला विचारण्यात आलं होतं. मी त्यावेळी छोट्या पडद्यावर 'कौन बनेगा करोडपती' हा शो करत होतो. खरं सांगू तर मला असं वाटतं होतं की चित्रपटातील सुत्रसंचालकाची भूमिका ही स्वार्थी होती. तर 'कौन बनेगा करोडपती' या शोच्या निर्मात्यांची इच्छा होती की मी हा चित्रपट करायला हवी. मात्र, सुत्रसंचालकाची भूमिका ही कपटी आणि बेईमान व्यक्तीची होती.' 


हेही वाचा : सलमान खानचा मेहुणा अडकणार लग्नबंधनात! क्रितीच्या पोस्टमुळे चर्चांना उधाण


पुढे शाहरुख म्हणाला, 'मला हे थोडं वेगळं वाटलं की जिथे एकीकडे मी 'कौन बनेगा करोडपती' हा शो करतोय, तर दुसरीकडे एका कपटी सुत्रसंचालकाची भूमिका साकारू? त्यामुळे मग मी मिस्टर बॉयलला समजावलं की मला ही भूमिका करायची नाही. इंडस्ट्रीमध्ये माझ्याहून चांगले अनेक कलाकार आहेत, जे ही भूमिका खूप चांगल्या प्रकारे साकारू शकतात. त्यानंतर ही भूमिका अनिल कपूर यांनी केली आणि त्यांनी अप्रतिमरित्या साकारली.'