मुंबई : 'पठाण' आणि 'टायगर 3' हे दोन्ही सिनेमांची आतुरतेने वाट पाहिली जात आहे.  सलमान खान आणि कतरिना कैफ यांच्या 'टायगर 3' ने सुरूवातीपासूनच प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे. शाहरूख खान तब्बल 4 वर्षांनंतर 'पठाण' सिनेमातून बिग स्क्रीनवर कमबॅक करत आहे. 'पठाण' सिनेमात शाहरूख खान, दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राइम झळकणार आहेत. या सिनेमाची देखील चर्चा आहे. हे दोन्ही सिनेमे एकामेकांसमोर भिडणार होते. मात्र सलमान खानने घेतला महत्वाचा निर्णय. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'पठाण'च्या आधी 'टायगर 3' रिलीज होणार आहे कारण YRF म्हणजे यश राज फिल्मने खुलासा केला आहे. सलमान खान 'पठाण' सिनेमातून कॅमिओ करणार आहे. त्यामुळे 'टायगर 3' सिनेमाच्या अगोदर 'पठाण' सिनेमा प्रदर्शित होणार आहे. 



इंडस्ट्रीतील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसरा, 'पठाण' प्रत्यक्षात 'टायगर 3' च्या आधी रिलीज होईल. पठाणमध्ये असे आहे की, टायगर 3 चित्रपटाच्या शेवटी कॅमिओ करणार आहे. ज्यामध्ये सलमानचा खास रोल असणार आहे. सिनेमात सलमान खानचा खास रोल असणार आहे. यामध्ये वेगळ्या अवतारात दिसणार आहे. 


'टायगर 3' मध्ये इम्रान हाश्मी मुख्य विरोधी भूमिकेत दिसणार आहे. हा सिनेमा 'बॅंड बाजा बारात' फेम मनीष शर्मा दिग्दर्शित आहे. दुसरीकडे, 'पठाण'चे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद करत आहे.