Shah Rukh took wedding proposal of salman to actress : बॉलिवूडचा भाईजान आणि मोस्ट इलिजिबल बॅचलर सलमान खान कधी लग्न करणार असा प्रश्न त्याचे चाहते नेहमीच उपस्थित करतात. पण त्याचं उत्तर त्यांना कधीच मिळत नाही. सलमानच्या कुटुंबापासून त्याच्या मित्रांपर्यंत कोणाकडेच त्याचं उत्तर नाही. अनेकांना याविषयी माहित आहे की सलमान खानचं लग्न ठरलं होतं इतकंच नाही तर त्याच्या लग्नाचे कार्ड देखील छापण्यात आले होते. याशिवाय त्याचा जवळचा मित्र अभिनेता शाहरुख खाननं देखील सलमानचं लग्न व्हाव यासाठी प्रयत्न केला होता. त्यासाठी शाहरुख हा सलमानच्या लग्नाची मागणी घालत एका अभिनेत्रीच्या घरी गेला होता. याचा खुलासा स्वत: सलमाननं एका शोमध्ये केला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दस का दम या शोमध्ये शाहरुख खान आणि रानी मुखर्जी यांनी हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांनी सलमानच्या लग्नाचा हा किस्सा सुनावला होता. सलमानच्या लग्नाचा विषय निघाला तेव्हा शाहरुख त्याच्या मागेच लागला. तेव्हा सलमान म्हणाला की 'माझ्या लग्नानं तुझा काय फायदा होणार आहे?' यावर उत्तर देत शाहरुख म्हणाला, 'मी खरंच बोलतोय. ही माझी इच्छा आहे. इतकंच नाही तर मला माहित आहे की मी असा प्रश्न करायला नको, कारण सगळे तुला हेच विचारतात. मीडिया पण विचारते.'



यानंतर रानी मुखर्जी शाहरुखला म्हणाली की मला वाटतं की फक्त तुलाच हक्क आहे कारण तू सलमानचा सगळ्यात जुना मित्र आहे. हे ऐकल्यानंतर सलमान खान म्हणाला की हो, याची इच्छा आहे. एकदा घेऊन पण गेला होता. है ऐकल्यानंतर शाहरुख हसू लागला होता आणि म्हणाला की, 'पण मला एक गोष्ट सांगायचं आहे की जो स्वभाव आहे ना, तो चांगला नाही. त्याचा स्वभाव खूप जवळून पाहिला आहे.'


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


हेही वाचा : विकी कौशलला सेटवर येऊन पोलिसांनी केली होती अटक, त्यामागचं कारण काय?


यानंतर रानी मुखर्जी बोलते की 'मी नाव सांगू'. तर सलमान तिच्याकडे आश्चर्यानं पाहत 'नको' असं म्हणतो. त्यावर आता नेटकरी म्हणतात की ती मुलगी दुसरी कोणी नसून ऐश्वर्या आहे. कारण त्यावेळी शाहरुख त्याची पत्नी गौरीसोबत ऐश्वर्याच्या घरी तिला भेटायला गेला होता. त्यावेळीच त्यानं ऐश्वर्यासमोर सलमानशी लग्न करण्याची मागणी घातली होती.