विकी कौशलला सेटवर येऊन पोलिसांनी केली होती अटक, त्यामागचं कारण काय?

Vicky Kaushal Arrest : विकी कौशलला सेटवरून करण्यात आली होती अटक, अनुराग कश्यपनं केला खुलासा...

दिक्षा पाटील | Updated: Oct 30, 2023, 03:21 PM IST
विकी कौशलला सेटवर येऊन पोलिसांनी केली होती अटक, त्यामागचं कारण काय? title=
(Photo Credit : Social Media)

Vicky Kaushal Arrest : बॉलिवूड अभिनेता विकी कौशल हा लोकप्रिय बॉलिवूड कलाकारांपैकी एक आहे. अभिनयानं विकीनं प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. विकीचे लाखो चाहते असून त्याच्या सोशल मीडिया पोस्टची ते आतुरतेनं प्रतिक्षा करतात. विकीनं काहीही केलं तरी तो चर्चेचा विषय ठरतो. त्याचा अभिनय सगळ्यांना आवडत असला तरी विकीनं अभिनय क्षेत्रात थेट पदार्पण केलं नव्हतं. विकीनं चित्रपटसृष्टीत सहाय्यक दिग्दर्शक म्हणून पदार्पण केलं होतं. त्यावेळी असं काही झालं होतं की थेट सेटवर पोलिसांनी विकीला अटक केलं होतं. 

का झाली होत विकीला अटक? 

विकीच्या पहिल्या चित्रपटाविषयी सगळ्यांना माहित आहे. त्यानं मसान या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. या चित्रपटात त्यानं महत्त्वाची भूमिका साकारली होती. पण या आधी विकीनं दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या ‘गँग्स ऑफ वासेपुर’ या चित्रपटात विकी असिस्टंट दिग्दर्शक होता. यासोबत त्यानं या चित्रपटात एक छोटी भूमिका देखील साकारली होती. दरम्यान, जेव्हा अनुराग कश्यप हा कपिल शर्माच्या शोमध्ये पोहोचला होता. तेव्हा त्यानं या चित्रपटाच्या सेटवरील एक गोष्ट सांगितली. अनुराग कपिलशी बोलताना म्हणाला की 'जेव्हा आम्ही वासेपुरचं शूटिंग करत होतो तेव्हा विकी कौशलला पोलिसांनी अटक केली होती. त्याचं कारण म्हणजे आम्ही जिथे शूटिंग करत होतो त्यासाठी आम्ही कोणतीही परवानगी घेतली नव्हती. त्यामुळे विकीला तुरुंगात जावे लागले होते.' 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

विकीच्या कामाविषयी बोलायचे झाले तर, त्यानं ‘मसान’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. विकीनं या चित्रपटात जसं काम केलं त्याची सर्वत्र चर्चा सुरु होती तर अनेकांनी त्याची स्तुती देखील केली होती. त्यानंतर विकीला अनेक ऑफर मिळू लागल्या होत्या. यानंतर उरी आणि संजूसारखे गाजलेल्या चित्रपटात विकीनं काम केलं. तर त्यानंतर त्यानं कतरिना कैफसोबतच्या रिलेशनशिपच्या चर्चांमुळे सगळ्यांचे लक्ष वेधले होते. त्यानंतर 2021 मध्ये विकी आणि कतरिनानं उदयपुरमध्ये शाही थाटामाटात लग्न केलं. 

हेही वाचा : 22 वर्षांपूर्वी झाला होता KBC चा पहिला करोडपती, आता करतो 'हे' काम

विकीचा 'द ग्रेट इंडियन फॅमिली' हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. यानंतर विकी हा 'सॅम बहादुर' या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट 1 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट आणि रणबीर कपूरचा एनिमल हे दोन्ही चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे विकी आणि रणबीरमध्ये बॉक्स ऑफिससाठी लढाई असेल. एकाच दिवशी हे चित्रपट प्रदर्शित होणार असून सगळ्यांचे लक्ष वेधणार आहे.