मुंबई : शाहिद कपूर (Shahid Kapoor)सोशल मीडियावर खूप ऍक्टिव असतो. हल्लीच शाहिद कपूर पत्नी मीराची मस्करी करताना दिसला. ज्यानंतर पत्नी मीराने शाहिदला आपल्या अंदाजात धमकी दिली. शाहिदने बेडरबममधील खास फोटो जगासमोर शेअर केले. ज्यानंतर मीराला खूप राग आल्याच दिसलं. 


शाहीदने उडवली मिराची खिल्ली 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शाहिद कपूर (Shahid Kapoor) आणि त्याची पत्नी मीरा राजपूत (Mira Rajput) यांची जोडी चाहत्यांना खूप पसंत आहे. ही जोडी सोशल मीडियावर देखील खूप ऍक्टिव आहे. एवढंच नव्हे तर हे दोघं एकमेकांकरता खास फोटो आणि प्रेमाचा संदेश देखील शेअर करत असतात. शाहिदचा नुकतीच एक नवी पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. ज्यावर मीराने आपल्या शैलीत खास उत्तर दिलं आहे. 



वास्तविक शाहिद कपूरने इंस्टाग्राम स्टोरीवरून त्याच्या बेडरूमचा एक फोटो शेअर केला आहे. तो पोस्ट करून त्याने त्याची प्रेमळ पत्नी मीरा राजपूतची खिल्ली उडवताना काही प्रश्न विचारले आहेत. ज्याचे उत्तर मीराने त्याला विचारले आहे. एक इशारा देत तिने सांगितले की काही दिवस थांबा,  सर्व कळेल. इंस्टाग्राम स्टोरीमधून शाहिद कपूर त्याच्या बेडरूमचा एक फोटो शेअर करताना मीराला विचारत आहे, 'तुला बेडवर इतक्या उशा का आवडतात मीरा, का? का?'



याआधी शाहिदने मीरासोबतचा एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्यामध्ये मीरा हिरव्या रंगाच्या पोशाखात दिसत होती आणि शाहिद शर्टलेस दिसत होता. व्हिडीओमध्ये शाहिद हसत होता तर मीरा राजपूत कपडे घालण्यासाठी धडपडताना दिसत आहे. वास्तविक, मीरा जेव्हा कपडे घालत होती तेव्हा शाहिद गुपचूप व्हिडिओ बनवत होता.