Shah Rukh Khan on not Doing Pushpa Movie : बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खाननं आमिर खानच्या फ्लॉप ठरलेल्या 'लाल सिंह चड्ढा' या चित्रपटावर त्याचं मत मांडलं आहे. शाहरुख खाननं सांगितलं की त्याला या चित्रपटासाठी ऑफर मिळाली होती. तर त्यानं या चित्रपटाला नकार दिला. त्यासोबत आमिरनं देखील हा चित्रपट करायला नको होता याविषयी देखील त्यानं वक्तव्य केलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शाहरुख खाननं विकी कौशल आणि करण जोहरनं मिळून IIFA होस्ट केलं. या दरम्यान, लोकांचे मनोरंजन करण्यासाठी त्यांनी स्वत: ची आणि इतरांची खिल्ली उडवली. यावेळी त्यानं दावा केला की सगळ्यात आधी त्याचाकडे मोठ्या चित्रपटांच्या ऑफर येतात आणि तो त्या चित्रपटांना करण्यास नकार देतो. तेव्हा जाऊन दुसऱ्या कलाकारांना त्या चित्रपटांच्या ऑफर मिळतात. शाहरुख खानचं हे वक्तव्य ऐकून विकी कौशलला आश्चर्य झालं. त्यानं शाहरुखसमोर काही बड्या चित्रपटांची नावं घेतली आणि त्या चित्रपटांना नकार का दिला याचं कारण देखील सांगितलं.


जेव्हा विकीनं शाहरुखला विचारलं की त्यानं ‘लाल सिंह चड्ढा’ का केला नाही? त्यावर उत्तर देत शाहरुख म्हणाला, आमिर खाननं देखील हा चित्रपट करायला नको होता. शाहरुखचं उत्तर ऐकून विकी आणि प्रेक्षक दोघेही हसू लागले. त्यानंतर शाहरुखनं मस्करी बाजूला करत 'आय लव्ह यू, आमिर' असं म्हटलं.' दरम्यान, आमिर आणि करीनचा हा चित्रपट 2022 मध्ये प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट फ्लॉप ठरला. चित्रपट बनवण्यासाठी 180 कोटी रुपयांचं बजेट होतं तर चित्रपटानं 130 कोटींची कमाई केली. 


हेही वाचा : अमिताभ बच्चन दिवसाला 200 सिगारेट फुकायचे, जी मिळेल ती दारू...; 'या' कारणामुळे सोडली व्यसनं


विकीनं शाहरुख खानला विचारलं की सुकुमार दिग्दर्शित ‘पुष्पा: द राइज’ ची ऑफर मिळाली होती? तर त्यावर उत्तर देत शाहरुख खान म्हणाला, 'अरे देवा, यार, तू माझ्या जखमेवर मीठ चोळतोयस. मला तर खरंच पुष्पा करायचा होता, पण अल्लू अर्जुनसमोर माझं स्वगॅ कमी पडला.' पुष्पाच्या आगामी भागाविषयी बोलायचं झालं तर ‘पुष्पा 2: द रूल’ 6 डिसेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्यात पुन्हा एकदा रश्मिका मंदाना आणि फहाद फासिल त्यांच्या त्यांच्या भूमिकेत दिसणार आहे.