मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहरूख खानचा अबराम हा 27 मे रोजी 5 वर्षाचा झाला. याचं औचित्य साधून शाहरूख खानने आपल्या मुलाचा फोटो शेअर केला आहे. या फोटोला शाहरूख खानच्या चाहत्यांनी खूप पसंत केलं असून आणि अबराम याचा देखील स्टार किड्समध्ये पहिला नंबर लागतो. अबरामचे देखील खूप फॅन फॉलोअिंग आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शाहरूख खानचं म्हणणं आहे की प्रत्येक मुलाने आपला स्वतःचा आवाज ऐकला पाहिजे. मुलांनी आपल्या स्वतःवर विश्वास ठेवला पाहिजे. शाहरूखची 3 मुले आहेत. आर्यन, सुहाना आणि अबराम. अबराम रविवारी पाच वर्षाचा झाला. यावेळी शाहरूख खानने आपल्या अबरामचा फोटो शेअर करताना 'सनशाइन' अशी कमेंट केली आहे. 



शाहरूख खानने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, माझा सनशाइन हा 5 वर्षांचा झाला आहे. मात्र तो विचार करतो की तो 9 वर्षांचा आहे. जर तुम्ही त्याला भेटलात तर कृपा करून सांगू नका. लहान मुलांना आपल्या स्वतःची आवाज ऐकायची असते. तुम्ही त्यांच्याशी बोलायला पाहिजे. त्यांच्या छोट्या छोट्या स्वप्नांवर विश्वास ठेवायला पाहिजे. आपल्या वडिलांना एकसारखं मिठीत घेतलं पाहिजे.