Aryan Khan Nora Fatehi: सध्या सगळीकडेच चर्चा आहे ती शाहरूख खानच्या पठाण (Paathan) या चित्रपटाची. हा चित्रपट सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकलेला आहे. त्याचबरोबर या चित्रपटातील काही दृश्यं ही वगळ्यात यावी याबद्दलही सेन्सॉर बोर्डाकडे (Censor) मागणी करण्यात आली आहे. परंतु आता शाहरूख खानपेक्षा त्याच्या मुलाची पुन्हा एकदा चर्चा निर्माण झाली आहे. यावेळी मात्र त्याला आणि नोरा फतेहीला एका पार्टीत रंगे हात पकडण्यात आलं आहे. हा फोटो सध्या सगळीकडे व्हायरल (Nora Fatehi and Aryan Khan) होतो आहे. या फोटोवरून ते दोघं एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. या व्हायरल होणाऱ्या फोटोत नोरा आणि आर्यन एकमेकांना डेट (Aryan Khan and Nora Fatehi Dating) करत असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. त्यामुळे सध्या आर्यन आणि नोरा चांगलेच चर्चेत आले आहेत. (Shahrukh Khan Son Aryan Khan Dating with Noora Fatehi Know the truth behind viral photos)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या नोरा फतेही आपल्या मनिके (Manike) या गाण्यात खूप ग्लॅमरस डान्स केला आहे. त्यामुळे सध्या ती चांगलीच चर्चेत आहे. त्यातून शाहरूख खानचा मुलगा हाही गेल्या दोन वर्षांमध्ये खूप चर्चेत राहिलेले आहेत. सध्या या फोटोंमुळे दोघांच्याही डेटिंगच्या चर्चांना उधाण आलं आहे. हा फोटो त्यांच्या एका फॅनचा असल्याचे बोललं जात आहे. तिनं एकाच वेळी शाहरूथ खानचा लेक आर्यन खान आणि नोरा फतेहीसोबत फोटो काढले आहेत. त्यामुळे हे फोटो सध्या सगळ्या सोशल मीडिया साईट्सवर (Social Media) तूफान व्हायरल होत आहेत.


या एकाच फॅनसोबत एका फोटोत नोरा तर दुसऱ्या फोटोत आर्यन खान दिसतो आहे. पण या फॅनसोबत त्या दोघांचा एकत्रित फोटो काही व्हायरल झालेला नाही. त्यामुळे लोकांपासून लपवण्यासाठी हे दोघं काय एकमेकांना डेट करत आहेत का काय, असा संशय सगळीकडे व्यक्त केला जातो आहे. या फोटोंमुळे ते काय एकत्र होते का, आणि एकत्र होते तर कुठे होते यावर अनेक जण प्रश्नोत्तर सोशल मीडियावर (Viral News) व्हायरल करताना दिसत आहेत. सध्या या फोटोंमुळे इंटरनेटवर चर्चांवर चर्चा सुरू झाल्या आहेत. आर्यन खान यापुर्वीही अनेक मुलींना डेट करत होता. त्यावरूनही अनेकदा चर्चा सूरू होत्या. अशाप्रकारे शाहरूख खानचा लेकही अनेकदा चर्चेत राहिला आहे. त्यातून आता नोरा फतेहीचं नावं लागल्यामुळे शाहरूख खानचा मुलगा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. 



आर्यन खानची मागच्या वर्षी ड्रग्ज (Aryan Khan Controversy) केसमुळे खूप प्रसिद्धी झाली होती. शेवटी त्याला क्लिनचीटही मिळाली. परंतु या कॉन्ट्रोव्हर्सीमुळे आर्यन खान आणि शाहरूख खानचं करिअरही धोक्यात आलं होतं.