मुंबई : साऊथची लोकप्रिय अडल्ट अभिनेत्री (Adult Actress) शकीला खानचा (Shakeela Khan) आज 19 नोव्हेंबर रोजी जन्म झाला. शकीलाने आपल्याच जवळच्या व्यक्तीमुळे आयुष्यात खूप काही सहन केलं आहे. शकीलाच्या आतापर्यंतच्या आयुष्यात खूप चढ-उतार आले. कधी आईने पैश्याकरता वैश्या बनण्यास आग्रह केला तर कधी जगाच्या टोमण्याने तिचं जगण हैराण झालं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शकीलाने 20 व्या वर्षी आपल्या सॉफ्ट पॉर्न 'प्लेगर्स' सिनेमातून करिअरला सुरूवात केली. सिनेमात तिने सपोर्टिंग अभिनेत्रीला रोल स्विकारला आहे. चैन्नईत जन्माला आलेल्या शकीला यांच बालपण अतिशय गरिबीत गेलं. त्यांनी फक्त सहावीपर्यंत शिक्षण घेतलं आहे. शकीला आजदेखील साऊथ सिनेमांमध्ये ऍक्टिव असून त्यांनी मल्याळम, तमिळ, तेलुगू आणि कन्नड सिनेमांमध्ये काम केलं आहे. 


2000 मध्ये मल्याळम भाषेत 'किन्नर थुंबिकल' हा सिनेमा प्रदर्शित झाला आणि या सिनेमाने तिला खूप पैसा कमावून दिला. अनेक भाषांत हा सिनेमात डब देखील करण्यात आला. शकीलाला या सिनेमातून पैसा आणि नाव मिळालं. पण ही ओळख अडल्ट अभिनेत्री म्हणूनच ओळखली गेली. शकीलाने आतापर्यंत 250 हून अधिक सिनेमांत काम केलं आहे. 


अभिनेत्री शकीलाने स्मिताच्या पाऊलावर पाऊल ठेवत अडल्ट सिनेमांत पाऊल ठेवलं. शकीलाने मल्याळम भाषेत आपली ऑटोबायोग्राफी लिहिली असून खूप लहान वयात एका व्यक्तीने त्यांचा बलात्कार केला. या बदल्यात त्याने शकीलाच्या आईला पैसे देण्याच कूबल केलं. दिलेल्या मुलाखतीत शकीला म्हणाली की, त्यावेळी ती काही दुसरं करू शकली नाही. मी माझ्या आईसोबतच राहिले. शकीला यांना 8 भावंड होती त्यांच्या संगोपनाची जबाबदारी तिच्यावर होती. 


शकीलाने दोन दशक दक्षिण भारतीय अडस्ट सिनेमावर राज्य केलं. तिने तामिळ, तेलुगु, मल्याळम आणि कन्नड भाषेत काम केलं. लवकरच ऋचा चड्डा शकीलाच्या बायोपिकमध्ये दिसणार आहे.