फक्त डोसे करून कमवा 28 लाख रुपये; Shashank Ketkar नं दिली माहिती
Shashank Ketkar Viral Video : शशांक केतकरनं सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत डोसा शेफसाटी २८ लाख रुपये पगार असलेल्या त्या रेस्टॉरंटविषयी सांगितलं आहे. इतकंच काय तर त्यासोबत तिथं वेकेन्सी असल्याचं देखील त्यानं सांगितलं. अशात आता कोणाला डोसा येत असेल तर ते अप्लाय करू शकता असं म्हटलं.
Shashank Ketkar Viral Video : नाश्ता म्हटलं की सगळ्यांना आठवते ईडली, डोसा, मेदू वडा. आज असे अनेक लोक आहेत जे नाश्तासाठी दाक्षिणात्य पदार्थांना पसंती देतात. आपली आई सुद्धा बऱ्याचवेळा नाश्त्यासाठी आपल्याला हे पदार्थ बनवून देत असते. हे फक्त दाक्षिणात्य भारतात नाही तर संपूर्ण भारतात आहे. हे जाऊ द्या ओह्ह... भारता बाहेर गेलेल्या अनेकांना हे पदार्थ खाण्याची इच्छा होते. अशात अनेक लोक भारतीय रेस्टॉरंटच्या शोधात असतात जिथे त्यांना हे दाक्षिणात्य पदार्थ खायला मिळतील. त्यासाठी त्यांना कितीही पैसे मोजावे लागले तरी त्यांना चालते. पण तुम्हाला माहितीये का? परदेशात डोसा बनवता येणाऱ्या व्यक्तीला वर्षाचा किती पगार देतात माहितीये का? याविषयी लोकप्रिय अभिनेता शशांक केतकरनं सांगितलं आहे.
आता तुम्हाला हा देखील प्रश्न असेल की परदेशाचं शशांकला कसं माहिती? तर शशांक हा सध्या इंग्लंडमध्ये फिरायला गेला आहे. शशांकनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट शेअर करत त्याची माहिती दिली आहे. शशांक फिरत असताना, हौन्सला वेस्ट भागातील मद्रास फ्लेवर्स नावाच्या रेस्टॉरंटचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत शशांकनं दाखवलेल्या व्हिडीओत रेस्टॉरंटनं लावलेली जाहिरात दिसत आहे. तिथे डोसा शेफची वेकेंसी असल्याचे सांगत आहे. तर डोसा बनवणाऱ्या शेफचा वार्षिक पगार हा २८ हजार पौंड म्हणजेच भारतीय रुपयांमध्ये म्हणायचे झाले तर 28 लाख 63 हजार 16 रुपये एवढी किंमत आहे. हा व्हिडीओत शशांक म्हणाला, 'तसं माझं बरं चालू आहे पण, काय म्हणता मग व्हायचं का शिफ्ट?' तर व्हिडीओ शेअर करत शशांकनं कॅप्शन दिलं की, डोसे करता येतात??? मग या तुम्ही.. 28,00,000 रुपये पगार आहे.'
हेही वाचा : चित्रपट प्रदर्शनाचा आनंद दु:खात बदलला, एक दिवसआधी 'या' मराठी चित्रपट दिग्दर्शकाचं निधन, चित्रपटसृष्टी हळहळली
शशांकची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. हे पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर विविध कमेंट देखील केल्या आहेत. एक नेटकरी म्हणाला, बघा आमच्यासाठी काही होतंय का तिकडे घरी डोसे बनवण्याचे काय मिळेना तिथ मिळतंय तर जावं. दुसरा नेटकरी म्हणाला, उगाच इतकं शिक्षण घेत बसले... लहाणपणी डोसा बनवायवा शिकायला पाहिजे होतं. तिसरा नेटकरी म्हणाला, 'मला येतात...पण नेणार कोण तिकडे....?' तिसरा नेटकरी म्हणाला, 'लय छान आहे तु आमचा विचार करतोस तुजे विचार पण चांगले आहे पण आपला देश बरा.' आणखी एक नेटकरी म्हणाला, 'इतक्या पैशात लंडनमध्ये काही नाही होत.'