Shehnaaz Gill Travelling in Auto Richshaw: अभिनेत्री शेहेनाज गिल (Shehnaaz Gill in Auto) ही आपल्या ग्लॅमरस अदाकारीसाठी ओळखली जाते. तिचा 'किसी का भाई किसी की जान' (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) हा चित्रपट नुकताच 22 एप्रिलला प्रदर्शित झाला होता. परंतु हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपली फारशी चांगली जादू दाखवू शकला नाही. शेहेनाज गिल ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. इन्टाग्रामवर तिचे असंख्य फॉलोवर्स आहेत. ती आपल्या मादक अदांनी सोशल मीडियावरून आपल्या चाहत्यांना घायाळ करत असते. तिचं नुकतंच एक हटके फोटोशूट सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल झालं होतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी तिनं ब्लॅक ड्रेसमध्ये आपल्या चाहत्यांना अक्षरक्ष: मोहात पाडलं होतं. तिच्या फोटोंनाही प्रचंड लाईक्स (Shehnaaz Gill Hot Photoshoot) मिळतात. परंतु सध्या शेहेनाज गिल वेगळ्याच एका कारणासाठी चर्चेत आली आहे. 


शेहेनाज गिल आपल्या आईसोबत रिक्षातून प्रवास करताना दिसली आहे. तिचे हे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. शेहेनाज गिलचा 'देसी वाईब्स विथ शेहेनाज गिल' (Shehnaaz Gill Show) हा शो चर्चत आहे. पंजाबची कतरिना कैफ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेहेनाजला आज तमाम लोकप्रियता मिळाली आहे. 'बिग बॉस' या शोमधून तिला भलतीच लोकप्रियता मिळाली होती. त्यानंतर ती अनेक शोजमधून प्रेक्षकांच्या भेटीला आहे. सध्या तिनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं असून तिचा 'किसी का भाई किसी की जान' (Salman Khan Shehnaaz Gill) हा सलमान खानसोबतचा चित्रपटही प्रदर्शित झाला आहे. सोशल मीडियावर या चित्रपटाची सगळीकडेच क्रेझ होती. 


हेही वाचा - आंतरराष्ट्रीय सिनेतारकांच्या गोतावळ्यात उठबस करणाऱ्या Priyanka Chopra ची 'ती' चूक, म्हणाली, ''आजही मला त्याची लाज वाटते''


यावेळी मध्यरात्री तिनं आपल्या आईसोबत रिक्षामध्ये बसून प्रवास केला. परंतु रिक्षात बसून ती नक्की कुठे गेली अथवा जाऊन आली याबद्दल कुठलाच खुलासा तिनं केला नाही परंतु तिचे सेल्फीतले फोटोज सध्या व्हायरल झाले आहेत. शेहेनाजकडे रेंज रोवर, मर्सिडिज आणि जगुआर अशा महागड्या गाड्या (Shehnaaz Gill Car Collection) आहेत परंतु इतक्या महागड्या गाड्यांना नाही म्हणत चक्क शेहेनाजनं रिक्षातून प्रवास केला आहे. 



शेहेनाज गिलचा 'किसी का भाई किसी की जान' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात सलमान खान, वेंकटेश दग्गुबाती, पूजा हेगडे, जगपती बाबू, भुमिका चावला, विजेंद्र सिंग, अभिमन्यू सिंग, राघव जुयाल, सिद्धार्थ निगम, जस्सी गिल, शहनाज गिल, पलक तिवार, विनाली भटनागर अशांच्याही भुमिका आहेत. शेहेनाज गिल आणि सिद्धार्थ शुक्ला यांच्या नात्यामुळे ते दोघं अधिक चर्चेत आले होते. 2021 मध्ये सिद्धार्थ शुक्लाचा मृत्यू झाला होता.