आंतरराष्ट्रीय सिनेतारकांच्या गोतावळ्यात उठबस करणाऱ्या Priyanka Chopra ची 'ती' चूक, म्हणाली, ''आजही मला त्याची...''

Priyanka Chopra Mexican Food: मेक्सिकन फूड खाणं प्रियांका चोप्राला एका कार्यक्रमादरम्यान महागात पडलं होतं. तिनं एका मुलाखतीतून (Priyanka Chopra Interview) याबाबत खुलासा केला आहे. सध्या तिचं हे वक्तव्य बरेच चर्चेत आलं आहे. त्यामुळे प्रियांका ट्रोलही झाली आहे. तर काहींनी तिच्या प्रामाणिकपणाचे कौतुकही केले आहे. परंतु आंतरराष्ट्रीय पातळीवर कलाकारांमध्ये उठबस करणाऱ्या प्रियांकाचे हे कृत्य ऐकून अनेकांना धक्काही बसला आहे. 

गायत्री हसबनीस | Updated: May 7, 2023, 09:58 PM IST
आंतरराष्ट्रीय सिनेतारकांच्या गोतावळ्यात उठबस करणाऱ्या Priyanka Chopra ची 'ती' चूक, म्हणाली, ''आजही मला त्याची...'' title=
फाईल फोटो

Priyanka Chopra Mexican Food: प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) ही आजची आघाडीची हॉलिवूड अभिनेत्री आहे. तिच्या 'सिटाडेल' (Citadel) या वेबसिरिजनं सध्या सगळीकडे अक्षरक्ष: धुमाकूळ घातला आहे. ही वेबसिरिज रिलिजच्या काही दिवसातच लोकप्रिय ठरली आहे. तिच्या या वेबसिरिजची त्यामुळे सगळीकडेच चर्चा सुरू झाली आहे. परंतु सध्या प्रियांकानं आपला एक जुना किस्सा शेअर केला आहे ज्याचीच सगळीकडेच चर्चा आहे. एका मुलाखतीत तिनं आपल्या हॉलिवूडमध्ये वावरताना झालेल्या लज्जास्पद कृत्याबद्दल सांगितले आहे. (priyanka chopra reveals that she had farted after having mexican food in front of everyone in an interview)

यावेळी तिनं सांगितले की मॅक्सिकन जेवण खाल्ल्यानंतर अपानवायू सोडला होता. त्याबद्दल तिला पाश्चात्ताप होत असल्याचे तिनं सांगितले आहे. नक्की असं काय घडलं होतं? याबद्दल तिनंच खुलासा केला आहे. 'द लॅटिश शो विथ मो गिलिन'सोबत (The Lateish Show with Mo Gilligan) दिलेल्या एका मुलाखतीत प्रियांकानं याबद्दल खुलासा केला आहे. त्यात तिनं आपण लोकांच्यात असताना सगळ्यांसमोर अपानवायू सोडला होता असं कबूल केलं आहे. ती म्हणाली, ''मी ही आठवण कधीच विसरू शकत नाही. कोणालाही हे माहिती नव्हतं परंतु मी तेव्हा मॅक्सिकन फूड (Mexican Food) खाल्लं होतं. कारण मी कोणत्याच गोष्टीला नाही म्हणत नाही.'' 

सगळ्यांसमोर केलं होतं 'ते' कृत्य

प्रियांका आपल्या हटके अंदाजासाठी कायमच चर्चेत असते. ती आपल्या आगळ्यावेगळ्या फॅशन सेन्ससाठीही ओळखली जाते. आपल्या लाडक्या मुलीला मालती घेऊन सोशल मीडियावर तिचे आणि आपले फॅमिली फोटोज शेअर करत असते. मालती मेरीच्या जन्मानंतर तिनं तिच्या मुलीचा चेहरा रिव्हिल केला नव्हता परंतु त्यानंतर मागच्या वर्षी तिनं आपल्या लेकीचा चेहरा चाहत्यांना दाखवला. मालतीचा क्यूटनेस पाहून सगळेच तिच्या सौंदर्यावर फिदा झाले आहेत. मालतीला घेऊन प्रियांका चोप्रानं काही दिवसांपुर्वी सिद्धिविनायकाचेही (Priyanka Chopra Daughter) दर्शन घेतले होते. त्यांचे फोटोही व्हायरल झाले होते. 

हेही वाचा - बॉलिवूडची पोलखोल करत अभिनेत्रीनं उचललं मोठं पाऊल, Video शेअर करत म्हणाली, ''मला इतकी वर्षे काहीच...''

चित्रपटांची रांग 

'सिटाडेल'सह 'लव्ह अगेन' या हॉलिवूडच्या प्रोजेक्ट्समधून प्रियांका चोप्रा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सोबतच तिचा आलिया भट्ट आणि कतरिना कैफसोबतचा 'जी ले जरा' हा चित्रपटही चित्रिकरणाच्या प्रक्रियेत आहे. या चित्रपटाची सगळ्यांनाच उत्सुकता लागून राहिली आहे. 1 मे ला प्रियांकानं 'मेट गाला'मध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी तिच्या महागड्या नेकलेसचीच सगळीकडेच चर्चा सुरू झाली होती. हा डायमंडचा नेकलेस 204 कोटी रूपयांचा होता. 2000 साली मिस वर्ल्ड ही सौंदर्यस्पर्धा जिंकल्यानंतर प्रियंकानं मागे वळून पाहिलंच नाही. आज 23 वर्षांत तिनं आपली राष्ट्रीयच काय तर आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली ओळख निर्माण केली आहे.