मुंबई : अभिनेत्री शिल्पा शिंदे लवकरच एका वेब सीरिजच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. अनेक मालिकांमध्ये मुख्य भूमिका साकारल्यानंतर तिने आपला मोर्चा ओटीटी प्लॅटफॉर्मकडे वळवला आहे. ती आता 'पौराशपूर' (Paurashpur)या सीरिजच्या माध्यमातून आपलं नशीब आजमावणार आहे. सीरिजमध्ये ती राणी मीरीवती यांची व्यक्तीरेखा साकारताना दिसणार आहे. शिवाय अनेक दिवसांनंतर ती अभिनय करताना दिसणार आहे.  'गँग्स ऑफ फिल्मिस्तान' (Gangs of Filmistan) या टीव्ही शोनंतर ती 'पौराशपूर' सीरिजमध्ये दिसणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या नव्या भूमिकेसाठी ती अत्यंत खूश असल्याचं सांगतं आहे. 'या प्रॉजेक्टवर काम करण्यासाठी मी अतिशय उत्साही आहे. 'पौराशपूर' सीरिज मधील कथा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रसारित न झालेल्यांपैकी एक आहे. त्यामुळे सीरिजमध्ये राणी मीरीवती यांची व्यक्तीरेखा साकारण्याची संधी मला मिळाली म्हणून मी अत्यंत खूश असल्याचं तिने सांगितलं. 


महत्त्वाचं म्हणजे सीरिजमध्ये अभिनेता आणि मॉडेल मिलिंद सोमण देखील झळकणार आहे. शिवाय अन्नू कपूर (Annu Kapoor),शहीर शेख (Shaheer Sheikh) आणि फ्लोरा सैनी (Flora Saini) देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.  ही सीरिज लवकरच अल्ट बालाजी आणि झी 5वर प्रदर्शित होणार आहे.