Shivali Parab करते कॉफी पार्टनरची प्रतिक्षा? त्या फोटोनं वेधलं लक्ष
Shivali Parab Maharashtrachi Hasyajatra : महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातील शिवाली ही सोशल मीडियावर सक्रिय असून नुकताच तिनं एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत ती कॉफी पार्टनरच्या प्रतिक्षेत असल्याचे म्हटले आहे. याफोटोनं सगळ्यांचे लक्ष वेधलं आहे.
Shivali Parab Maharashtrachi Hasyajatra : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कॉमेडी मालिकांपैकी एक म्हणजे 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' आहे. या कार्यक्रमानं सगळ्यांनाच वेड लावलं आहे. सर्वसाधारण जनतेपासून राजकारण्यांपर्यंत सगळेच या कार्यक्रमातील विनोद कधी ना कधी कुठे कुठे बोलताना दिसतात. या कार्यक्रमातील सगळ्याच कलाकारांचे लाखो चाहते आहेत. त्या सगळयांच्या आयुष्यात काय सुरु आहे हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक आतुर असतात. अशात अभिनेत्री शिवाली परबनं तिच्या सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका पोस्टनं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे.
शिवालीनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये शिवाली खूप बोल्ड अंदाजाच दिसत आहे. शिवालीनं हिरव्या रंगाचा शिमरी टॉप परिधान केला आहे. तर तिचे हे फोटो एका कॅफेतले आहेत. एका फोटोत तिच्या हातात कॉफी मग आहे. तर दुसऱ्या फोटोत तिच्या हातात फुलं आहेत. तर तिसऱ्या आणि शेवटच्या फोटोत शिवाली आरशात पाहत आहे. हे फोटो शेअर करत शिवालीनं कॅप्शन दिलं आहे की “मी माझ्या कॉफी पार्टनरची प्रतिक्षा करते…” शिवालीची ही पोस्ट व्हायरल झाली असून सगळ्यांचे लक्ष हे तिच्या कॅप्शननं वेधलं आहे.
शिवालीच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंट केल्या आहेत. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला की तू महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाच्या शुटिंगची प्रतिक्षा करत आहेस. दुसरा नेटकरी म्हणाला, खूप खूपचं सुंदर. तिसरा नेटकरी म्हणाला, अरे बापरे मरतो की काय मी. आणखी एक नेटकरी म्हणाला, कल्याणची चूलबुली. दुसरा नेटकरी म्हणाला, कोण आहे तुम्हाला प्रतिक्षा करत थांबवणारा? तर काही नेटकऱ्यांनी शिवाली हे खरं आहे का? असा सवाल केला आहे. शिवालीच्या या पोस्टनं सगळ्यांसमोर प्रश्न उपस्थित झाला आहे की ती खरंच कोणासोबत रिलेशनशिपमध्ये आहे का?
हेही वाचा : "इंदिरा इज इंडिया...", कंगणा रणौतच्या Emergency चित्रपटाचा टीझर पाहिलात का?
दरम्यान, शिवाली ही महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमात विविध भूमिका साकारते. तिची प्रत्येक भूमिका ही प्रेक्षकांच्या पसंतीसही उतरते. शिवाली या शोमध्ये कशी आली तिला संधी कशी मिळाली हा प्रश्न अनेकांना आहे. तर शिवालीनं बदलापुरमध्ये एका महोत्सवात काम केले होते. त्यावेळी हास्यजत्रा फेम नम्रता संभेरराव आणि अरुण कदम हे त्या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन करत होते. त्यानंतर आगरी महोत्सव असल्यानं तिला तिथे आगरी भाषेत बोलायचं होतं ती भाषा त्यांच्या टीममधल्या मुलांना येत नव्हती, पण शिवालीला येत होती त्यामुळे तिला नम्रतानं संधी दिली आणि त्यानंतर तिच्या अभिनयाला पाहता नम्रतानं हास्यजत्रेसाठी तिचा रेफरन्स दिला.