Emergency Movie Teaser: बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या ‘टिकू वेड्स शेरू’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाला सोशल मीडियावर नवाजुद्दीन सिद्दीकी आणि अवनीत कौर यांच्यात असलेल्या वयाच्या फरकामुळे ट्रोल केले. तर काही नेटकऱ्यांनी चित्रपट पाहिल्यानंतर त्यावर त्यांनी संमिश्र प्रतिक्रिया दिली आहे. एकीकडे हा चित्रपट चर्चेत असताना कंगना दुसरीकडे ‘इमर्जन्सी’ या तिच्या आगामी चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या टीझरनं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे.
चित्रपटाच्या टीझरची सुरुवात ही 25 जून, 1975 साली देशात लागू करण्यात आलेल्या आणीबाणीच्या परिस्थितीवर आहे. त्यात लोक मोर्चा करत असल्याचे दिसत आहे. तर त्यानंतर एका वर्तमानपत्राचे कटआऊट दिसत आहे. त्याची हेडलाइन आहे की "स्टेट ऑफ इमर्जन्सी घोषित." तर बॅकग्राऊंडला अनुपम खैर यांचा व्हॉइस ओव्हर ऐकायला येत आहे. यात ते म्हणत आहेत की सगळ्या विरोधी पक्ष नेत्यांना अटक केले आहे. टीव्हीवरील ब्रॉडकास्ट बंद करण्यात आले. तर टीझरच्या सगळ्यात शेवटी कंगना रणौत इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसत आहे. ज्यावेळी कंगना इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसते. तेव्हा तिचा एक डायलॉग आहे ज्यानं सगळ्यांचे लक्ष वेधले आहेत. "मला या देशाची रक्षा करण्यापासून कोणीच थांबवू शकत नाही, कारण इंडिया इज इंदिरा अँड इंदिरा इज इंडिया”, असा हा डायलॉग आहे. हा 1 मिनिट 21 सेकंदाचा टीझर आहे.
हेही वाचा : "होळीच्या 'त्या' रात्री घडलं ते भयानक होतं...", अभिनेत्री Juhi Parmar चा मोठा खुलासा
दरम्यान, या चित्रपटात अनुपम खैर हे दिवंगत नेता जयप्रकाश नारायण म्हणजेच जेपी नारायण यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. तर श्रेयस तळपदे हा माजी पीएम अटल बिहारी बाजपेयी यांच्या भूमिकेत दिसत आहे. इमर्जन्सीच्या काळात अटल बिहारी बाजपेयी हे तुरुंगात गेले होते. याशिवाय अभिनेत्री महिमा चौधरी ही चित्रपटात पुपुल जयकारा या पत्रकाराच्या भूमिकेत दिसत आहे. त्या इंदिरा गांधी यांच्या मैत्रिण होत्या. वैशाख नायर या चित्रपचात इंदिरा गांधी यांचा मुलगा संजय गांधी आणि सतीश कौशिक यांनी या चित्रपटात माजी केंद्रीय मंत्री जनजीवन राम यांच्या भूमिकेत दिसत आहेत. हा सतीश कौशिक यांचा अभिनय क्षेत्रातील अखेरचा चित्रपट आहे. तर मिलिंद सोमण हा चित्रपटात फील्ड मार्शल सॅम मानेकशॉच्या भूमिकेत दिसणार आहे.