मुंबई : रणबीर कपूर आणि आलिया भट्टच्या अफेअरची चर्चा जोरदार सुरू आहे. या बॉलिवूड कपलवर जोरदार गॉसिप सुरू आहे. एवढंच नव्हे तर या दोघांच्या घरातले देखील कायम एकत्र दिसले आहेत. एवढंच काय तर रणबीरचे कुटुंबिय आलियाचं अगदी खुल्या दिलाने स्वागत करतात. तसेच दिवाळीच्या दिवसात रणबीर आणि आलिया अनेक पार्टीत एकत्र होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शाहरूख खानने आपल्या घरी दिवाळीची ग्रँड पार्टी आयोजित केली. एका मॅगझीनच्या मते या पार्टीत आलियाचा एक्स बॉयफ्रेंड सिद्धार्थ मल्होत्रा देखील होता. सिद्धार्थ मल्होत्रा आणि रणबीर कपूर एकमेकांसमोर आले. दोघांनी फक्त एकमेकांना हात भेटवून पुढे निघून गेले. 


तर दुसरीकडे असं झालं की, कतरिना आणि आलिया एकमेकींसमोर आल्या. कतरिना कैफ रणबीर कपूरची एक्स गर्लफ्रेंड होती. त्यामुळे आलियासमोर येताच कतरिना थोडीशी गोंधळली. कारण तेथे फोटोग्राफर्स होते म्हणून दोघींनी एकत्र फोटो काढले आणि तिथून निघून गेले. 


आलिया भट्ट आणि रणबीर कपूर आपल्या नात्याला पुढे घेऊन जाणार आहेत. सुत्रांच्या माहितीनुसार आलिया आणि रणबीर 2019 मध्ये लग्न करणार आहेत. तसेच सुत्रांकडून अशी माहिती मिळाली आहे की, आलिया फक्त रणबीरलाच नाही तर त्याच्या कुटुंबियांना देखील पसंत आहे.