महाराष्ट्रातील सर्वात प्राचीन राम मंदिर; प्रभू श्रीरामांनी सीता आणि लक्ष्मणासोबत वनवासातील 4 महिने येथेच घालवले

महाराष्ट्राच्या पूर्व विदर्भातील नागपूर जिल्ह्यातील रामटेक या टेकडीवर सर्वात प्राचीन राम मंदिर आहे. निबिड अरण्यात असलेल्या या मंदिराचे सौंदर्. पर्यटकांचे लक्ष वेधून घेते. रामटेक तलावाच्या काठावरुन आजूबाजूच्या टेकड्यांचे विलोभनीय सौंदर्य पहायला मिळते. 

| May 21, 2024, 20:10 PM IST

Ramtek Temple, Ram Mandir, Ramtek Hill in Maharashtra Nagpur  : महाराष्ट्राच्या पूर्व विदर्भातील नागपूर जिल्ह्यातील रामटेक या टेकडीवर सर्वात प्राचीन राम मंदिर आहे. निबिड अरण्यात असलेल्या या मंदिराचे सौंदर्. पर्यटकांचे लक्ष वेधून घेते. रामटेक तलावाच्या काठावरुन आजूबाजूच्या टेकड्यांचे विलोभनीय सौंदर्य पहायला मिळते. 

 

1/7

महाराष्ट्रातील नागपूरपासून 40 किलोमीटर अंतरावर असलेले रामटेक मंदिर हे प्रभू रामाचे सर्वात जुने मंदिर आहे.

2/7

रामटेक मंदिर किल्ल्यासारखे दिसते. राजा रघु खोंसले यांनी हे मंदिर किल्ला म्हणून बांधले होते. रामनवमीला येथे मोठा उत्सव भरतो.  या मंदिराबाबत अनेक अख्यायिका आहेत. 

3/7

महान कवी कालिदास यांनी मेघदूत हे महाकाव्य  देखील या रामटेक मंदिरातच लिहीले असे देखील पुराणात सांगण्यात आले. 

4/7

प्रभू राम आणि अगस्त्य ऋषी यांची भेट देखील या रामटेक मंदिरातच झाली होती.  

5/7

छोट्या टेकडीवर बांधलेल्या रामटेक मंदिराला गड मंदिर असेही म्हणतात. याशिवाय हे मंदिर सिंदूर गिरी नावानेही ओळखले जाते.

6/7

भगवान रामाने माता सीता आणि भगवान लक्ष्मणासोबत वनवासातील चार महिने येथेच घालवले होते अशी अख्यायिका आहे.   

7/7

रामटेक मंदिर हे हे जवळपास 400 वर्ष जुने असल्याचे समजते. रामटेक तलावाच्या काठावर हे मंदिर आहे.