व्हिडीओ बनवण्याच्या बहाण्याने बोलवत संपवलं गायिकेचं आयुष्य; देश हादरला
तिला म्युझिक व्हिडिओ बनवण्याच्या बहाण्याने बोलावल्याचा गौप्यस्फोटही यावेळी झाला
नवी दिल्ली : संपूर्ण देशाला हादरवणारी घटना नुकतीच दिल्लीत घडली. दिल्लीतील द्वारका परिसरातून संगीता उर्फ दिव्या बेपत्ता झाल्याप्रकरणी एक एफआयआर दाखल करण्यात आली. ज्यानंतर आता त्या गायिकेची हत्या झाल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे.
सदर प्रकरणी हरियाणातील मेहम भागातून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चौकशीत त्याने संगीता उर्फ दिव्याच्या हत्येचा कट रचल्याचे सांगितले. त्याने तिला म्युझिक व्हिडिओ बनवण्याच्या बहाण्याने बोलावल्याचा गौप्यस्फोटही यावेळी झाला. (shocking Delhi singer murder case )
अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एका आरोपीने तिला दिल्लीतून नेले आणि दारू नशायुक्त पदार्थ देऊन तिचं आयुष्य संपवलं. त्यानंतर दोन्ही आरोपींनी मिळून तिला हरियाणातील मेहम भागात रस्त्याच्या कडेला पुरले. सध्या मृतदेह मेहम भागातून हाती घेण्यात आला असून एफआयआर 244/22, 302/201 आयपीसी अंतर्गत मेहम पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
मृत संगीताचा मृतदेह पीजीआय रोहतक नेण्यात आला आहे. द्वारका जिल्ह्यातील जाफरपूर कलान पोलिसांचे पथक अटक आरोपीसह हरियाणातील मेहम येथे तपासासाठी गेले आहे. संगीता उर्फ दिव्या हिच्या पालकांना या प्रकरणी कळवण्यात आले ज्यानंतर पोलिसांनी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.
अटक केलेले दोन्ही आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून त्यांची सतत चौकशी सुरू आहे. रवी आणि अनिल अशी या दोघांची नावं आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघेही संगीताचे मित्र होते अशी माहिती समोर आली आहे. रवीविरोधात संगीतानं बलात्काराचाही गुन्हा दाखल केला होता. ज्यामुळं आता या प्रकरणाला नवं वळण मिळालं आहे.