मुंबई : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) हा पतौडीचा नवाब आहे. सैफ पाच हजार कोटी रुपयांच्या मालमत्तेचा मालक आहे. या मालमत्तेत हरियाणातील पतौडी पॅलेसपासून भोपाळपर्यंतच्या त्यांच्या पूर्वजांच्या अमाप संपत्तीचा समावेश आहे. पण तुम्हाला माहितये का की सैफ अली खान या संपत्तीचा कोणताही वाटा स्वतःच्या मुलांना देऊ शकणार नाही. 


आणखी वाचा : बॉयकॉटच्या ट्रेंडमध्ये आलियाकडून रणबीरला धोका?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सैफ त्याची मुलं म्हणजेच सारा अली खान(Sara Ali Khan) , इब्राहिम (Ibrahim Ali Khan), तैमूर (Taimur Ali Khan) आणि जेह (Jeh Ali Khan) यांना त्याची पाच हजार कोटींची संपत्ती देऊ शकणार नाही, असे म्हटले जातं आहे. एका न्यूज पोर्टलच्या वृत्तानुसार, पतौडीच्या घराशी आणि भांडवलाशी संबंधित सर्व Enemy Disputes Act of the India कायद्यांतर्गत येतात आणि अशा परिस्थितीत कोणीही या मालमत्तेचा वारस असल्याचा दावा करू शकत नाही. 


आणखी वाचा : कोण म्हणतं सैफच्या लेकाचं ब्रेकअप झालं? प्रेयसीसोबतचा 'तो' Video Viral



अहवालात असेही म्हटले आहे की जर एखाद्या व्यक्तीला Enemy Disputes Act of the India कायद्याचा विरोध करायचा असेल आणि कोणत्याही मालमत्तेवर दावा करायचा असेल, तर त्यांना उच्च न्यायालयात जावे लागेल.   इथेही त्यांचे ऐकले जात नसेल, मग पुढचा पर्याय त्यांच्यासमोर असतो तो सर्वोच्च न्यायालय आणि शेवटी देशाचा राष्ट्रपती.


आणखी वाचा : ...म्हणून चाहते चिरंजीवी यांची पूजा करतात; अभिनेत्याच्या मोठ्या निर्णयानं पुन्हा वळवल्या नजरा


सैफ अली खानचे पणजोबा, हमीदुल्ला खान हे ब्रिटीश राजवटीत नवाब होते आणि त्यांनी कधीही आपल्या मालमत्तेसाठी मृत्युपत्र केले नव्हते. या मालमत्तेवरून कुटुंबात वाद निर्माण होण्याची भीती त्यांना होती. सैफ अली खानचे वडील मन्सूर अली खान हे पतौडी घराण्याचे नववे नवाब होते जे एक प्रसिद्ध क्रिकेटर देखील होते आणि त्याच्या आईचं नाव शर्मिला टागोर आहे. सैफनं पहिलं लग्न अमृता सिंगसोबत केलं होतं, तिच्यासोबत त्याला सारा आणि इब्राहिम अशी दोन मुलं आहेत. यानंतर करीनाशी लग्न केल्यानंतर सैफला दोन मुलं झाली असून त्यांना तैमूर आणि जहांगीर.