कोण म्हणतं सैफच्या लेकाचं ब्रेकअप झालं? प्रेयसीसोबतचा 'तो' Video Viral

इब्राहिम अली खान आणि श्वेताचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो. 

Updated: Aug 22, 2022, 01:38 PM IST
कोण म्हणतं सैफच्या लेकाचं ब्रेकअप झालं? प्रेयसीसोबतचा 'तो' Video Viral  title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान आणि अमृता सिंहचा (Saif Ali Khan and Amrita Singh Son) लेक इब्राहिम अली खान (Ibrahim Ali Khan)हा लोकप्रिय स्टारकिड्स पैकी एक आहे. काही दिवसांपूर्वी इब्राहिम आणि छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री श्वेता तिवारीची (Shweta Tiwari) लेक पलक तिवारी (Palak Tiwari) यांचा ब्रेकअप झाल्याच्या चर्चा सुरु होत्या. दरम्यान, आता सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला असून ते पुन्हा एकदा रिलेशनशिपमध्ये असल्याचे म्हटले जात आहे. 

आणखी वाचा : ...म्हणून चाहते चिरंजीवी यांची पूजा करतात; अभिनेत्याच्या मोठ्या निर्णयानं पुन्हा वळवल्या नजरा

पलक ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत पलक चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकताच पलकचा एक व्हिडीओ सोशल मीडियावन व्हायरल झाला आहे. त्यानंतर पलक आणि इब्राहिम अली खानसोबत (Ibrahim Ali Khan) हे रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा पुन्हा एकदा सुरु झाल्या आहेत. 

आणखी वाचा : अरबाज आणि मलायकाच्या लग्नात असा दिसत होतो अर्जुन कपूर, फोटो पाहून व्हाल हैराण

 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

आणखी वाचा : 'परदेशात काढलेले फोटो जास्त क्लिअर अन्...', या पोस्टमुळे हेमांगी कवी ट्रोल

दरम्यान, आता व्हायरल झालेल्या व्हिडीओत एका रेस्टॉरंटमधून पलक बाहेर येते आणि तिच्या गाडीत बसून निघून जाते. पलकच्या पाठून इब्राहिम त्या रेस्टॉरंटमधून बाहेर येतो आणि तो त्याच्या गाडीत बसून निघून जातो. त्यांचा हा व्हायरल व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीनं शेअर केला आहे. 

आणखी वाचा : कियारा अडवाणीच्या 'या' छोट्या बॅगच्या किंमतीत येतील अनेक फोन, Price जाणून व्हाल थक्क

या व्हायरल झालेल्या व्हिडीओत पलकनं लाल रंगाचा बोल्ड टॉप आणि निळ्या रंगाची जीन्स परिधान केली आहे. तर इब्राहिमनं काळ्या रंगाचं टी-शर्ट, ब्राऊन रंगाचं जॅकेट आणि काळ्या रंगाची जीन्स परिधान केली आहे. पलक आणि इब्राहिमचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यांच्या बेस्ट जोडी आहे. ते दोघं एकत्र खूप सुंदर दिसतात अशा अनेक कमेंट केल्या आहेत.