...म्हणून चाहते चिरंजीवी यांची पूजा करतात; अभिनेत्याच्या मोठ्या निर्णयानं पुन्हा वळवल्या नजरा

चिरंजीव यांचा आज 67 वा वाढदिवस आहे. 

Updated: Aug 22, 2022, 11:42 AM IST
...म्हणून चाहते चिरंजीवी यांची पूजा करतात; अभिनेत्याच्या मोठ्या निर्णयानं पुन्हा वळवल्या नजरा  title=

मुंबई : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील मेगास्टार चिरंजीवी (Chiranjeevi) आज 22 ऑगस्ट रोजी त्यांचा 67 वा वाढदिवस साजरा करत आहेत. चिरंजीवी यांचे फक्त दाक्षिनेत चाहते नाही तर संपूर्ण देशात आहेत. चिरंजीवी हे नेहमीच गरजूंची मदत करताना दिसतात. रक्तदानाचा विषय असो किंवा चित्रपटसृष्टीत काम करणाऱ्या कामगारांसाठी लस वितरणाची व्यवस्था असो, त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे गरजूंची मदत केली आहे. आता चिरंजीवी चित्रपटसृष्टीतील कामगारांसाठी एक मोठं पाऊल उचलणार आहेत.

आणखी वाचा : अरबाज आणि मलायकाच्या लग्नात असा दिसत होतो अर्जुन कपूर, फोटो पाहून व्हाल हैराण

रिपोर्ट्सनुसार, चिरंजीवी आता एक रुग्णालय सुरु करण्याच्या तयारीत आहेत. हैदराबादमधील चैत्रपुरी कॉलनीमध्ये ते आपलं हॉस्पिटल सुरू करण्याच्या तयारीत असल्याचं सांगण्यात येत आहे. पुढच्या वर्षीच्या वाढदिवसापर्यंत हे रुग्णालय सुरू होईल, असेही त्यांनी सांगितल्याचे म्हटले जाते.  

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

आणखी वाचा : 'परदेशात काढलेले फोटो जास्त क्लिअर अन्...', या पोस्टमुळे हेमांगी कवी ट्रोल

मीडिया रिपोर्टमध्ये असेही सांगण्यात आलं की, हे हॉस्पिटल पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबियांसह सर्व चित्रपटसृष्टीतील कामगारांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आहे. चांगली गोष्ट म्हणजे या रुग्णालयातील बहुतांश रुग्णांची तपासणी आणि उपचार एकतर मोफत केले जातील किंवा त्यांना खूप सूट दिली जाईल.

आणखी वाचा : कियारा अडवाणीच्या 'या' छोट्या बॅगच्या किंमतीत येतील अनेक फोन, Price जाणून व्हाल थक्क

या हॉस्पिटलमध्ये स्पेशलिस्ट नियमित फेऱ्या मारतील, असेही रिपोर्ट्समध्ये सांगण्यात येत आहे. रुग्णालयाबाबत आराखड्याचे काम सुरू आहे. चिरंजीवी यांना हे रुग्णालय किमान 10 बेडचं असावे असे म्हणालेत, जेथे सिने कामगारांच्या आरोग्यविषयक सर्व प्रकारच्या समस्यांवर उपचार करणे शक्य आहे आणि त्यासाठी त्यांना मोठ्या रुग्णालयात जाण्याची गरज नाही.