The Great Indian Kapil Show Shreyas Iyer : 'द ग्रेट इंडियन कपिल शो' मध्ये क्रिकेटर रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर यांनी हजेरी लावली होती. यावेळी क्रिकेटशिवाय मैदानाच्या बाहेरच्या गोष्टींवर चर्चा झाली. कपिलनं यावेळी श्रेयसची मस्करी केली. तर बोलता बोलता श्रेयसनं सांगितलं की आयपीएल दरम्यान, त्याची नजर एका सुंदर मुलीवर पडली होती. तिला पाहून श्रेयसनं हात देखील हलवला होता. जेणेकरून तिचं लक्ष जाईल. तर श्रेयस दुसरीकडे तिच्या मेसेजची प्रतिक्षा करत होता पण त्याला नैराश्येचा सामना करावा लागला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कपिल शर्मा श्रेयसची छेड काढत म्हणाला की जेव्हा मॅच दरम्यान, तो चौकर आणि षटकार मारतो, तेव्हा कॅमेरामॅन त्या मुलींवर फोकस करतात जे 'श्रेयस मॅरी मी' असा बोर्ड घेऊन उभ्या असतात. कपिलनं पुढे विचारलं की "श्रेयस तू नंतर कॅमेरामॅन वगैरेंकडून हे जाणून घेतात का की ती मुलगी कुठे उभी होती." त्यावर श्रेयसनं उत्तर दिलं की "जेव्हा माझं आयपीएलचं पहिलचं वर्ष होतं तेव्हा मला स्टॅंडमध्ये एक सुंदर मुलगी दिसली होती. तिला पाहून मी हात हलवत तिला हॅलो म्हणालो. मॅचसंपल्यानंतर ती माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करेल असं मला वाटलं होतं. त्यामुळे मी फेसबूकवर तिच्या मेसेजची प्रतिक्षा करत होतो आणि सतत चेक करायचो की तिचा मेसेज आलाय का? त्या नंतर मी अशा कोणत्याही गोष्टीकडे लक्ष दिलं नाही. ही फक्त एकमेव अशी घटना आहे जी माझ्यासोबत घडली." 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


दरम्यान, कपिलनं रोहित शर्माला विचारलं की "कोणत्या क्रिकेटर्ससोबत तो रूम शेअर करु शकत नाही." या प्रश्नावर उत्तर देत रोहित म्हणाला की "मी शिखर धवन आणि ऋषभ पंतसोबत रुम शेअर करु शकत नाही. ते स्वच्छता पाळत नाहीत."


हेही वाचा : Allu Arjun Birthday : 'पुष्पा 2' चा Powerpack टीझर प्रेक्षकांच्या भेटीला; आग ओकणारे डोळे, थरकाप उडवणारी अ‍ॅक्शन...


यावेळी शोमध्ये रोहित शर्माची पत्नी रितिका देखील होती. तर कपिलनं तिला विचारलं की अनुष्कासोबत मॅच बघतेस तेव्हा ते दोघं कोणत्या गोष्टीवर चर्चा करतात? यावर उत्तर देत रितिका म्हणाली जेव्हा रोहित खेळत असतो तेव्हा ती चुपताप बसते, काही बोलत नाही.