मुंबई : फार कमी काळात कलेच्या बळावर, संघर्ष करत गायिका नेहा कक्कर हिनं बॉलिवूडमध्ये वेगळं स्थान प्रस्थापित केलं. नावारुपास आल्यानंतर नेहानं तिच्या वैयक्तिक आयुष्याला प्राधान्य देत लग्नबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला. रोहनप्रीत सिंग या गायकासोबत ती विवाहबंधनात अडकली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लग्नाला काही दिवस उलटलेले असतानाच नेहाच्या काही छायाचित्रांनी ती गरोदर असल्याच्या चर्चांना वाव दिला. पहिल्यावहिल्या बाळाच्या स्वागतासाठी नेहा सज्ज असल्याचंही म्हटलं गेलं. पण, या चर्चा हवेतच विरल्या. आता पुन्हा एकदा नेहाच्या गरोदरपणाच्या चर्चांना वाव मिळत आहे. कारण, ठरत आहे तिचं वक्तव्य. 


‘Dance Deewane 3’ या रिअॅलिटी शोच्या मंचावर नेहानं याबाबत वक्तव्य केल्याचं पाहायला मिळालं. गुंजन नावाच्या स्पर्धकाचा परफॉर्मन्स पाहून नेहा म्हणाली, 'रोहू आणि मी अद्यापही बाळाचा विचार केलेला नाही. पण, जेव्हा केव्हा आम्ही बाळाचा विचार करु तेव्हा आम्हाला गुंजनसारखंच बाळ हवं आहे.' नेहानं आता व्य़क्त केलेली ही इच्छा पाहता, ही सेलिब्रिटी जोडी खऱ्या आयुष्यात गुडन्यूज कधी देते याचीच उत्सुकता चाहत्यांना लागली आहे. 




मागच्या वर्षी ऑक्टोबर महिन्यामध्ये नेहानं रोहनप्रीतशी लग्न केलं होतं.  लग्नानंतर दोनच महिन्यांमध्ये नेहा गरोदर असल्याच्या चर्चांना उधाण आलं. या वरुन नेहा आणि रोहनप्रीतला मोठ्या प्रमात ट्रोलही करण्यात आलं होतं.