गायक एस. पी. बालसुब्रमण्यम यांची प्रकृती नाजूक
कोरोनाची प्राथमिक लक्षणं आढळून आल्यानंतर खुद्द सुब्रमण्यमच चेन्नईतील एमजीएम रुग्णालयात दाखल झाले होते.
मुंबई : प्रसिद्ध गायक एस. पी. बालसुब्रमण्यम यांची प्रकृती नाजूक असल्याची बाब समोर येत आहे. त्यांना कोरोना विषाणूची लागण झाल्यामुळे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र आता त्यांची प्रकृती नाजूक असल्याचं वृत्त समोर येत आहे. MGM रुग्णालयाने या संदर्भात एक पत्रक काढून ही माहिती दिली आहे. ऑगस्ट महिन्यात त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती.
कोरोनाची प्राथमिक लक्षणं आढळून आल्यानंतर खुद्द सुब्रमण्यमच चेन्नईतील एमजीएम रुग्णालयात दाखल झाले होते. ज्यानंतर त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यांच्या या चाचणीचा अहवाल पॉझिटीव्ह आला. डॉक्टरांनी त्यांना गृह विलगीकरणाचाही पर्याय दिला. पण, त्यांनी रुग्णालयातच उपचार घेण्याचा निर्णय घेतला.
आपल्याला रुग्णालयातून लगेचच रजा मिळेल असा त्यांचा समज होता, पण अद्यापही त्यांना डिसचार्ज मिळालेला नाही उलट त्यांची प्रकृती नाजूक असल्याचं रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले आहे.
सुब्रमण्यम यांनीच सोशल मीडियावर रुग्णालयातून आपला एक व्हिडिओ पोस्ट करत आपण उपचार घेत असल्याची माहिती चाहत्यांना दिली होती.