मुलगी आहे की बार्बी डॉल, निळे डोळे आणि बाहुलीसारखा डान्स, तिच्यावर खिळल्या सर्वांच्या नजरा
पाहा या `बार्बी डॉल`चे अफलातून व्हिडीओ
मुंबई : निळ्या, काळ्या, हिरव्या डोळ्यांची बाहुली तुम्ही पाहिली असेल. मुलीचे डोळे एखाद्या 'बार्बी डॉल' सारखे असतील तर लवकर कोणाचा त्यावर विश्वास बसणार नाही. पण सध्या सोशल मीडियावर चर्चेत असलेली मुलगी फक्त एखाद्या 'बार्बी डॉल'सारखी दिसत नाही, तर ती 'बार्बी डॉल' प्रमाणे डान्स पण करते. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त या 'बार्बी डॉल'ची चर्चा आहे.
या मुलीचं सौंदर्य खरंच अप्रतिम आहे. शिवाय तिच्या कलेला तर शब्द कमी पडतील. 'बार्बी डॉल' सारख्या दिसणाऱ्या या मुलीचं नाव आहे प्रिती कुमारी... सोशल मीडियावर तिचं नाव तूतूप्रीत असं आहे. तिच्या इन्स्टाग्रामवर तिनशेपेक्षा अधिक व्हिडीओ आहेत.
सोशल मीडियावर प्रोफाईलवर तिने तिच्या आवडींबद्दल सांगितलं आहे. प्रितीला संगीतप्रेमी, चित्रकला, डान्स आणि गायन यांमध्ये विशेष रस आहे. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.
प्रिती नव्या-जुन्या सर्व प्रकारच्या गाण्यांवर 'बार्बी डॉल' प्रमाणे डान्स करताना दिसते . प्रत्येक ट्रेंडिंग गाण्यावर ती तिच्या कलात्मकतेने तिच्या फॉलोअर्सचे मनोरंजन करते.
तिच्या मेकअपपासून ते हेअर स्टाइलपर्यंत सर्व काही एखाद्या बाहुलीप्रमाणे आहे. प्रितीची शरीर रचनाही एखाद्या बार्बी डॉलपेक्षा कमी नाही.