सोनाक्षीची Dahaad वेबसिरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला! नोट करा रिलिज डेट...
Dahaad Movie Release Date: सोनाक्षी सिन्हाचा `दहाड` ही सिरिज (Dahaad) लवकरच प्रदर्शित होतो आहे. तेव्हा येत्या 12 मे ला ही सिरिज प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे सगळ्यांनाच या सिरिजची (Sonakshai Sinha New Series) उत्सुकता लागून राहिली आहे. सोनाक्षीच्या चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे.
Dahaad Movie on Amazon Prime: अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा मध्यंतरी काही कारणांमुळे (Sonakshi Sinha New Series) चित्रपटसृष्टीपासून दूर राहिलेली दिसली. त्यामुळे प्रेक्षकांना तिच्या चित्रपटांची उत्सुकतेनं आतुरता लागून राहिलेली असली तरी तिचे चित्रपट काही प्रदर्शित होऊ शकले नाहीत. परंतु आता तिच्या चाहत्यांची वाट ही संपलेली आहे. सोनाक्षी सिन्हाचा (Dahaad Movie Teaser) नवाकोरा चित्रपट आता प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. दहाड असं सोनाक्षीच्या नव्या सिरिजचं नावं आहे ज्यात ती एका पोलिसांच्या भुमिकेतून दिसणार आहे. या सिरिजच्या रिलिज डेटची सध्या घोषणा झाली आहे.
ही सिरिज 12 मे रोजी अॅमेझॉन प्राईमवर प्रदर्शित होणार आहे. ज्याची घोषणा अॅमेझॉन प्राईमनं (Amazon Prime Dahaad) त्यांच्या ऑफिशियल इन्टाग्राम पेजवरून ही माहिती दिली आहे. त्यामुळे तुमची उन्हाळ्याची सुट्टी फारच खास जाणार आहे. सोनाक्षी सिन्हाचे दबंग हे सर्वच चित्रपट गाजले. या चित्रपटात सोनाक्षी सिन्हा ही एका पोलिसाच्या प्रेमात पडते. सलमान खाननं चुलबूल पांडे या पोलिस निरिक्षकाची भुमिका केली होती. आता स्वत: सोनाक्षी दहाड या सिरिजमधून एक पोलिस कॉन्सेबलची भुमिका करताना दिसते आहे.
या सिरिजमध्ये 8 पार्ट्स असतील. अंजली भाटी (Sonakshi Sinha) असं सोनाक्षीच्या भुमिकेचे नाव आहे. यामध्ये अनेक रहस्य आहेत. सार्वजनिक शौचालयात काही महिला या आश्चर्यकारक रीतीनं मृत पावतात. त्यावेळी अंजलीला संशय येतो की हे काम कुठल्यातरी सिरियल किलरनं केलं असावं.
या सिरिजमधून क्राईम ड्रामा पाहायला मिळणार आहे. या सिरिजमध्ये सोनाक्षीची भुमिका नक्कीच यापेक्षा वेगळी आहे. या सिरिजमधून सोनाक्षी सिन्हा ही डिजिटल डेब्यू करणार आहे. हा सोनाक्षीचा पहिला वहिला ओटीटीचा प्रोजेक्ट प्रदर्शित होतो आहे. रीमा कागती आणि झोया अख्तर (Zoya Akhtar) या सिरिजच्या निर्मात्या आहेत. ही सिरिज द बर्लिन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलला प्रदर्शित झाली आहे आता ही सिरिज लवकरच 12 मेला प्रदर्शित होईल. त्यानंतर अंजली याचा शोध घ्यायला सुरूवात करते. या सिरिजचं दिग्दर्शन हे रूचिका ऑबेरॉयसह विजय वर्मा, गुलशन दैवेया आणि सोहम शहा यांनी केले आहे.
सध्या ही सिरिज सगळ्यांसाठी पर्वणीच ठरली आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये. सोनाक्षी सिन्हा यावर्षी 'डबल एक्सएल' (Double XL) या चित्रपटातून दिसली होती परंतु हा चित्रपट फारसा चालला नाही. या चित्रपटाचा विषय हा वेगळा होता आणि सोनाक्षीचा लुकही. परंतु आता या चित्रपटानंतर सोनाक्षीच्या 'दहाड' या चित्रपटाची सगळ्यांनाच उत्सुकता लागून राहिली आहे.