Sonakshi Sinha' Mother and Brother : बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा ही सध्या तिच्या लग्नाच्या तयारीत व्यग्र आहे. 23 जून रोजी सोनाक्षी ही बॉयफ्रेंड झहीर इक्बालशी लग्न बंधनात अडरणार आहे. तर चर्चा अशी आहे की सोनाक्षीचे वडील म्हणजेच शत्रुघ्न सिन्हा या नात्यानं ना खूश नाहीत. मीडियात देखील त्यांनी अशा प्रकारचं वक्तव्य केलं ज्यानंतर हे सगळं स्पष्ट झालं. पण आता असं म्हटलं जात आहे की शत्रुघ्न सिन्हा नाही तर सोनाक्षी सिन्हाची आई आणि भाऊ या लग्नानं नाराज आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खरंतर सोनाक्षी सिन्हाची आई पूनम सिन्हा आणि भाऊ लव्ह सिन्हा हे दोघं इन्स्टाग्रामवर आहेत. पण ते दोघं सोनाक्षी सिन्हाला फॉलो करत नाही. इतकंच नाही तर सोनाक्षी देखील तिच्या आईला म्हणजेच पूनम यांना इन्स्टाग्राम अकाऊंटवर फॉलो करत नाही. सोनाक्षीची आई इन्स्टाग्रामवर फक्त 6 लोकांना फॉलो करते यात शत्रुघ्न सिन्हा, मुलगा लव्ह सिन्हा आणि कुश सिन्हा, डिंपल यादव आणि अखिलेश यादव देखील आहे. पण या लिस्टमध्ये सोनाक्षी सिन्हा नाही. तर सोनाक्षी देखील तिची आई आणि भाऊ लव्ह सिन्हाला फॉलो करत नाही. इतकंच नाही तर लव्ह सिन्हा देखील सोनाक्षीला इन्स्टाग्राम अकाऊंटवरून फॉलो करत नाही. मात्र, भाऊ कुशला सोनाक्षी इन्स्टाग्राम अकाऊंटवर फॉलो करते आणि तो देखील तिला फॉलो करतो. तर सोनाक्षी ही वडील शत्रुघ्न सिन्हा यांना इन्स्टाग्राम अकाऊंटवर फॉलो करते.  



हेही वाचा : 'आता त्या दोघांची मुलं होतील आणि...' लव्ह जिहादचा उल्लेख करत सोनाक्षी- जहीरच्या लग्नावर स्वरा भास्कर असं का म्हणाली


सोनाक्षी आणि तिच्या आईनं आता इन्स्टाग्राम अकाऊंटवर एकमेकांना अनफॉलो केलं आहे किंवा ते आधीपासून एकमेकांना फॉलो करत नव्हते, हे अजून काही समोर आलेलं नाही. पण जर त्यांना एकमेकांना आता अनफॉलो केलं असेल तर नक्कीच त्यांच्यात काही तरी वाद असल्याचं म्हणता येईल. 


सोनाक्षीच्या लग्नात कुटुंब लावणार हजेरी? 


सोनाक्षी सिन्हाचे वडील शत्रुघ्न यांना त्यांच्या लेकीच्या लग्नाविषयी विचारण्यात आलं तर तेव्हा त्यांनी सांगितलं की आजकालची मुलं सांगतात? तर सोनाक्षीचे मामा पहलाज निहलानी यांनी शत्रुघ्न हे त्यांच्या लेकीवर जास्त काळ नाराज राहू शकत नाही. त्यांनी स्वत: त्यांच्या आवडीच्या मुलीशी लग्न केलंय. तर ते नक्कीच सोनाक्षीच्या लग्नात आनंदात सहभागी होतील.