'आता त्या दोघांची मुलं होतील आणि...' लव्ह जिहादचा उल्लेख करत सोनाक्षी- जहीरच्या लग्नावर स्वरा भास्कर असं का म्हणाली?

Swara Bhaskar On Sonakshi Sinha and Zaheer Iqbal's Wedding : स्वरा भास्करनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बालच्या लग्नावर तिची प्रतिक्रिया दिली आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Jun 20, 2024, 11:38 AM IST
'आता त्या दोघांची मुलं होतील आणि...' लव्ह जिहादचा उल्लेख करत सोनाक्षी- जहीरच्या लग्नावर स्वरा भास्कर असं का म्हणाली? title=
(Photo Credit : Social Media)

Swara Bhaskar On Sonakshi Sinha and Zaheer Iqbal's Wedding : बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा सध्या चर्चेत आहे. ती लवकरच तिचा बॉयफ्रेंड झहीर इक्बालसोबत लग्न बंधनात अडकणार आहे. तर सोशल मीडियावर सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बालच्या लग्नावरून वाद सुरु झाला आहे. या सगळ्यात आता लोकप्रिय अभिनेत्री स्वरा भास्करनं सोनाक्षी आणि झहीरच्या लग्नावरून सुरु असलेल्या वादावर संताप व्यक्त केला आहे. 

स्वरानं यावेळी लव जिहादच्या गोष्टी तिच्याविषयी देखील घडल्याचं म्हटलं आहे. त्याशिवाय एका मुस्लिम व्यक्तीशी लग्न केल्यामुळे तिला देखील ट्रोलिंगचा सामना करावा लागला असं सांगितलं. तिचं म्हणणं आहे की येणाऱ्या काळात सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बालला देखील अशा गोष्टींचा सामना करावा लागेल. 

पुढे स्वरानं सांगितलं की दोन प्रौढ त्यांच्या खासगी आयुष्यात काय करतात यानं कोणावर काही परिणाम व्हायला नको. स्वरानं पुढे सांगितलं की आता सोनाक्षीचं मुलं होऊ द्या, मग पुन्हा एकदा देशात वाद सुरु होईल. स्वरानं यावेळी आणखी बऱ्याच गोष्टींवर वक्तव्य केलं आहे. स्वरा भास्करनं 'कनेक्ट साइन'ला दिलेल्या सांगितले की स्वरा भास्करनं सांगितले की 'मॉडर्न इंडियाच सगळ्यात मोठं मिथ हे लव्ह जिहाद आहे. जिथे एक हिंदू मुलगी मुस्लिम मुलाशी लग्न करते. हे माझ्यावर देखील लागू होतं आणि काही शहरांमध्ये वेगळ्या धर्माच्या जोडप्यांवर व्हॅलेन्टाईन डेच्या दिवशी हानामारी करण्यात येते.' 

माझ्या लग्नावेळी...

स्वरा पुढे म्हणाली की,'माझ्या लग्नावेळी अनेक एक्सपर्ट्सनं त्यांची मतं माडंली. पण आम्ही इथेमोठ प्रौढांबद्दल बोलतोय. ते त्यांच्या खासगी आयुष्यात काय करतात, लग्न करतात की नाही, हे सगळं त्यांच्यावर आधारीत आहे. जर ते एकत्र राहत आहेत, कोर्टात लग्न करतायत किंवा आर्य समाजात लग्न करताय किवां निकाह करतायत, तर त्याच्याशी कोणाचंही देणंघेणं नाही. हे एक पुरुष आणि महिला आणि त्यांच्या कुटुंबातील गोष्ट आहे. ही सोनाक्षीचं आयुष्य आहे, तिनं तिचा साथीदार निवडला आहे. तिच्या पार्टनरनं देखील तिला निवडलं आहे. आता ही त्यांच्यातील आणि कुटुंबामधील गोष्ट आहे. मला आता हे सगळं उगीच वेळ वाया घालवण्यातील वाद दिसतोय.'

हेही वाचा : विवाहित अभिनेत्रीच्या प्रेमात होता अभिनेता! लग्नासाठी मोडला तिचा संसार; धर्मामुळे आजही होते 'ही' जोडी

स्वरानं पुढे म्हटलं की 'अशा गोष्टी भारत आणि दक्षिण आशिया देशात जास्त होतं. जिथे लोकं दुसऱ्यांच्या आयुष्यात नाक खुपसतात. आता प्रतिक्षा करा, जेव्हा जहीर आणि सोनाक्षीला मुलं होईल, तेव्हा त्यांच्या नावावरून वेगळा वाद सुरु होईल. आपण करीना कपूर आणि सैफच्या मुलांना आणि माझ्या बाळाच्या वेळी हे पाहिलं. हा मुर्खपणा आहे कारण हे लवकर संपणार नाही.'