सोनम कपूरलाही या गंभीर आजाराने ग्रासलं
ला आयुष्यात कधीही श्वसनाचा त्रास झाला नव्हता. पण आता गेल्या काही दिवसांपासून होत आहे. मला ब्राँकायटिस हा आजार झाला आहे.
मुंबई : अभिनेत्री सोनम कपूरचा 'वीरे दी वेडिंग' हा आगामी सिनेमा आहे, पण त्या आधी सोनमने एक धक्कायदायक माहिती ट्ववीटरवर शेअर केली आहे, यात सोनम कपूरने म्हटलं आहे की, आपल्याला ब्राँकायटिस झाला आहे. ब्राँकायटिस म्हणजे श्वसनाचा आजार, दमा.
पर्यावरणात होणाऱ्या सततच्या बदलांमुळे सोनमला श्वास घेण्यास त्रास होत आहे. ट्विटमध्ये सोनम म्हणाली की, मला आयुष्यात कधीही श्वसनाचा त्रास झाला नव्हता. पण आता गेल्या काही दिवसांपासून होत आहे. मला ब्राँकायटिस हा आजार झाला आहे. हा आजार फार भयंकर आहे.
अभिनेत्री रिचा चड्ढाच्या पोस्टलाही सोनमने रिट्विट केले आहे. रिचाने तिच्या ट्विटमध्ये म्हटले की, कोणाला मुंबईच हवामान दुषित झाल्यासारखं वाटतंय का? गेल्या काही दिवसांपासून मला श्वास घेण्यास अवघड जातंय. असं वाटतंय की आपण पावडर खात आहोत.
ब्राँकायटिस दोन प्रकारचा असतो. एक असतो एक्युट यात एक ते तीन आठवडे त्रास होतो. तर तर दुसरा असतो क्रोनिक. यात दोन वर्षांचा कालावधी असतो. यामुळे दरवर्षी कमीत कमी तीन महिने माणूस आजारी राहतो.
अभिनेत्री सोनम कपूरचा आगामी सिनेमा 'वीरे दी वेडिंग', या सिनेमाचे 2 पोस्टर्सही काही दिवसांपूर्वी प्रदर्शित करण्यात आले. या पोस्टरमधील सोनमचा लूक पाहून या सिनेमातील तिची भूमिका नेमकी काय असेल, असा प्रश्न तिच्या फॅन्सना पडला आहे.