मुंबई : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक सोनम कपूर 20 ऑगस्ट रोजी आई झाली. तिने एका मुलाला जन्म दिला असून, त्यानंतर ती सतत चर्चेत असते. लक्षात घेण्यासारखं आहे की, मार्चमध्ये तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून तिच्या प्रेग्नेंसीबद्दल माहिती दिली होती. त्यानंतर ती अनेकदा लाइमलाइटचा भाग राहिली आहे. त्याचबरोबर एका मुलाखतीत तिने तिच्या प्रेग्नेंसीबद्दल  तिला कोणत्या अडचणींचा सामना करावा लागला याबद्दल सांगितलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या अडचणींचा करावा लागला समाना 
सोनमने पुढे सांगितलं की, यावेळी तिला खूप अडचणी आल्या. त्यादरम्यान, लंडनमधील अनेक लोकं कोराना पॉझिटीव्ह येत होते. ज्यामुळे तिने स्वतःची काळजी घेण्याचं ठरवलं. पण तरिही ती महिनाभरानंतर आजारी पडली. तिला सर्दी, खोकला आणि ताप आला होता. त्यामुळे ती खूप घाबरली होती. तिने सांगितलं की, त्यानंतर तिने प्रेग्नेंसीमध्ये कोरोना होण्याबाबत गुगलवर सर्च करायला सुरुवात केली.


 सोनमच्या मते, तो काळ खूप कठीण होता. मॅटरनल तिच्या वयापेक्षा जास्त असल्याने तिला पोटात आणि मांड्यामध्ये प्रोजेस्टेरॉनचे शॉट्स  लागत होते, उलट्या होत होत्या आणि ती फक्त अंथरुणावर पडून असायची. 


सोनम पुढे म्हणाली की, वयाच्या ३१-३२ नंतर, जेव्हा आई होणार असतं, तेव्हा सगळ्यांना खूप काळजी वाटते. जास्त काही करू नका, पण मी म्हणायचे की माझ्या वडिलांच्या जीन्स आहे आणि मी अजूनही यंग आहे. विशेष म्हणजे सोनम वयाच्या 37 व्या वर्षी आई झाली आहे.