मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर मागच्या आठवड्यातच लंडनमधून भारतात परतली. यावेळी बाबा अनिल कपूर आपल्या मुलीला घरी घेऊन जाण्यासाठी एअरपोर्टवर पोहोचले होते. स्टार बाप-लेकीची ही जोडी यावेळी काहीशी भावूक झाल्याचं दिसून आलं. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओंमध्ये अनिल कपूर यांना पाहून सोनमला अश्रू अनावर झाले होते. दरम्यान सोनम कपूर लवकरच गुड न्यूज देणार असल्याच्या चर्चांनी ही जोर धरला. सोनमला अनेकांनी शुभेच्छा द्यायला देखील सुरुवात केली. पण अभिनेत्रीने आता या चर्चांना पुर्णविराम देत एक पोस्ट शेअर केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


सोनम कपूर तिच्या हटके स्टाईलिंगमुळे नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावर तिच्या पोस्ट या कमालीच्या व्हायरल होताना दिसतात. नुकतीच तिने शेअर केलेली Period Pain संदर्भातील पोस्ट सगळ्यांचच लक्षवेधून घेतेयं. या व्हिडिओत सोनम मासिळ पाळीच्या पहिल्या दिवशी होणाऱ्या त्रासाबद्दल बोलताना दिसतेयं.  


पहिल्या दिवशी होणारा त्रास कमी करण्यासाठी ती काय उपाययोजना करते याबद्दल तिने या पोस्टमध्ये सांगितलं आहे. सोनम म्हणते "मी गरम पाणी आणि आलं घातलेला चहा पिणं पसंत करते" 


सोनम कपूर तब्बल 1 वर्षानंतर भारतात परतली आहे. कोरोनाचे निर्बंध काहीसे शिथिल झाल्यानंतर सोनम आपल्या घरी आली आहे. मागील वर्षी सोनम तिच्या पतीसोबत लंडनमध्ये राहत होती. तिथेच ती पतीसोबत आपला बिझनेस सांभाळत होती.