Sonam Kapoor Speech at King Charles III’s Coronation : बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरनं किंग चार्ल्स यांच्या राज्याभिषेक सोहळ्यात हजेरी लावली होती. ती एकमेव भारतीय होती जिला हा मान मिळाला होता. हा खूप मोठा सोहळा होता. या सोहळ्याच्या निमित्तानं अनेक मोठ्या सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. किंग चार्ल्स यांच्या राज्याभिषेकाच्या एक दिवसानंतर रविवारी म्हणजेच 7 मे रोजी विंडसर कॅसलमध्ये टॉम क्रूझ आणि पुसीकैट डॉल्सचे निकोल शेर्जिंगर, कॅटी पेरी यांनी देखील हजेली लावली होती. या दरम्यान, सोनम कपूरनं एक स्पीच दिलं. तिच्या या स्पीचचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही व्हिडीओ क्लिप पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोनम कपूरची आई सुनीता यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून लेकीच्या स्पीचचा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओच्या सुरुवातीला सोनम नमस्ते बोलते. तिनं केलेल्या या जेश्चरला पाहता नेटकऱ्यांनी तिची स्तुती केली आहे. तर पुढे सोनम थोडक्यात म्हणाली, आपलं कॉमनवेल्थ हे एक युनियन आहे. आपल्यातील प्रत्येत व्यक्ती ही खास आहे. पण आपण नेहमी एक म्हणून पुढे येतो. सोनम तिच्या भाषणात म्हणाली, (Our Commonwealth is a union. Together we are one-third of the world’s people, one-third of the world’s ocean, one-quarter of the world’s land. Each of our countries is unique. Each of our people is special. But we choose to stand as one. Learning from our history, blessed by our diversity, driven by our values and determined to build a more peaceful, sustainable and prosperous future for everyone, where every voice is heard. Without further ado, here’s welcoming the incredible voices from across the Commonwealth.)



हेही वाचा : मोइदीन भाई येणार प्रेक्षकांच्या भेटीला! Rajinikanth यांच्या Lal Salaam चं पोस्टर प्रदर्शित


सोनमच्या कामाविषयी बोलायचे झाले तर तिच्या मुलाच्या जन्मानंतर ती मोठ्या पडद्यावर दिसली नाही. आता ती लवकरच आपल्याला मोठ्या पडद्यावर पुन्हा दिसणार आहे. तिच्याकडे सध्या शोम मखीजा यांचे दिग्दर्शन असलेले बनी ब्लाइंड या चित्रपटात दिसली. या चित्रपटात पूरब कोहली, विनय पाठक आणि लिलेट दुबे देखील दिसणार आहेत.