मोइदीन भाई येणार प्रेक्षकांच्या भेटीला! Rajinikanth यांच्या Lal Salaam चं पोस्टर प्रदर्शित

Rajinikanth Lal Salaam : रजनीकांत यांच्या या आगामी चित्रपटाचं पोस्टर नुकतंच प्रदर्शित झालं आहे. त्यांच्या या पोस्टवर कमेंट करत त्यांच्या चाहत्यांनी आनंद व्यक्त करत उत्साही असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, चित्रपटाचं दिग्दर्शन रजनीकांत यांची लेक ऐश्वर्या रजनीकांत करत आहे. 

दिक्षा पाटील | Updated: May 8, 2023, 10:24 AM IST
मोइदीन भाई येणार प्रेक्षकांच्या भेटीला! Rajinikanth यांच्या Lal Salaam चं पोस्टर प्रदर्शित title=
(Photo Credit : Aishwaryaa Rajinikanth Instagram)

Rajinikanth Lal Salaam : दाक्षिणात्या चित्रपटसृष्टीचे थलाइवा रजनीकांत लवकरच 'लाल सलाम' या चित्रपटात दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन त्यांची लेक ऐश्वर्या करत आहे. चित्रपटाच्या शूटिंगसाठी रजनीकांत मुंबईला पोहोचले आहेत. त्यांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. या चित्रपटात रजनीकांत हे मोइदीन भाई ही भूमिका साकारताना दिसणार आहेत. या चित्रपटात आणखी अनेक कलाकार आहेत. चित्रपटात जबरदस्त अॅक्शन आपल्याला पाहायला मिळणार आहे. एकीकडे रजणीकांत मुंबईत आले आहेत तर दुसरीकडे त्यांच्या या आगामी चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित झालं आहे. त्याचं हे पोस्टर सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल झालं असून त्याची सर्वत्र चर्चा सुरु आहे. 

रजनीकांत यांच्या या आगामी चित्रपटाचं पोस्टर त्यांची लेक ऐश्वर्यानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केलं आहे. हे पोस्टर शेअर करत ऐश्वर्या रजनीकांतनं '#Moideenbhai … तुमचे स्वागत आहे. लाल सलाम जेव्हा आपल्या हृदयाचे ठोके जोरात सुरु असतात तेव्हा कॅप्शन द्यायला सुचत नाही', असं कॅप्शन दिलं आहे. तिनं शेअर केलेल्या या पोस्टरमध्ये रजनीकांत यांचा एक हटके लूक पाहायला मिळाला आहे. यात रजनीकांत हे मोइदीन भाईच्या भूमिकेत दिसत आहेत. तर ऐश्वर्यानं शेअर केलेल्या या चित्रपटाच्या पोस्टरवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. तर लायका प्रोडक्शननं हे पोस्टर ट्विटरवर शेअर करत कॅप्शन दिलं की 'मुंबईत सगळ्यांचा आवडता भाई आला आहे. थलैवासाठी रस्ता द्या. रजनीकांत दिसणार मोइदीन भाईच्या भूमिकेत.' या पोस्टवर देखील नेटकऱ्यांनी विविध कमेंट केल्या आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हेही वाचा : 'साराभाई वर्सेस साराभाई' ते 'कपिल शर्मा शो'पर्यंत हे Comedy Show तुम्ही पाहिलेत का?

रजनीकांत यांच्या या आगामी चित्रपटाचं पोस्टर हे इंग्रजी आणि तमिळ भाषेत प्रदर्शित करण्यात आलं आहे. तर चित्रपटाचं दिग्दर्शन रजनीकांत यांची लेक ऐश्वर्या करत आहे. असं देखील म्हटलं जातं की या चित्रपटात रजनीकांत यांची पाहुण्या कलाकाराची भूमिका आहे. 'लाल सलाम' चित्रपटाच्या टीमविषयी बोलायचे झाले तर या चित्रपटात विष्णु विशाल आणि विक्रांत हे मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तर हा एक क्रिकेट ड्रामा असू शकतो असे म्हटले जात आहे. ए. आर. रहमाननं या चित्रपटासाठी म्युझिक दिलं आहे. दरम्यान, चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारिख सांगितलेली नाही, पण असं म्हटलं जातं की हा चित्रपट या वर्षी म्हणेच 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे. अशा प्रकारे रजनीकांत यांनी त्यांच्या चाहत्यांना भेट दिली आहे.