मुंबई : दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सोनू निगमच्या हत्येचा कट रचला होता, असा आरोप दोन दिवसांपूर्वी माजी खासदार निलेश राणेंनी केली होता. याबाबत गायक सोनू निगमला विचारलं असता तो मूग गिळून गप्प बसल्याचे पाहायला मिळालं. माध्यमांनी पुन्हा विचारलं असता त्याची बोलती बंद झाल्याचं दिसून आलं. सुरुवातीला काय बोलावं हेच लक्षात न आल्यानं शेवटी सोनूनं शांत राहणंच पसंत केलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दोन दिवसांपूर्वी शिवसेनेचं 'दैवत' असणाऱ्या दिवंगत बाळासाहेब ठाकरेंवर काँग्रेसचे माजी खासदार आणि नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे यांनी रत्नागिरीत गंभीर आरोप केले होते. आनंद दिघे यांच्या मृत्यूचा बाळासाहेब ठाकरेच जबाबदार असल्याचं सांगतानाच गायक सोनू निगम यालाही ठार मारण्याचा बाळासाहेबांनी प्रयत्न केला, असंही राणेंनी म्हटलं होतं. 


अधिक वाचा :- बाळासाहेबांनी रचला होता आनंद दिघे यांच्या हत्येचा कट, निलेश राणे यांचा गंभीर आरोप


'बाळासाहेबांच्या सांगण्यावरून शिवसैनिक अनेकदा सोनू निगम यांना मारण्यासाठी गेले होते. सोनू निगम तेव्हा घाबरले असतील पण आज बाळासाहेब नाहीत तर ते कदाचित याबद्दल सांगू शकतील... काय नातं होतं सोनू निगम आणि ठाकरे घराण्याचं हे मला सांगायला लावू नका... मला तोंड उघडायला लावलंत तर जाहीर सभेमध्ये हे सांगेन...' असंही त्यांनी यावेळी म्हटलं होतं. 


सोनू निगमची प्रतिक्रिया - व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा